शिवाजी सावंतगारगोटी: टिक्केवाडी ता. भुदरगड येथे गडहिंग्लज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून गोवा बनावटीची सहा लाख सहा हजार रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी संशयित सुनिल यशवंत देसाई (रा. टिक्केवाडी ता. भुदरगड जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, टिक्केवाडी येथे गोवा बनावटीची दारू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज शाखेला मिळाली. यामाहितीनुसार पथकाने टिक्केवाडीत छापा टाकला असता गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी संशयित आरोपी सुनिल देसाई यास अटक करण्यात आली. संशयित देसाई हा त्याच्या चारचाकी वाहनातून गोव्यातून मद्याचा साठा आणून त्याची विक्री करत असे. या कारवाईत मद्यासह एकूण ६ लाख ६ हजार ६३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अधीक्षक रविंद्र आवळे यांच्या आदेशानुसार जिल्हयात सातत्याने अवैद्य मद्य विक्रीबाबत छापे सत्र सुरु आहेत. त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज कार्यालयाने ही कारवाई केली. या कारवाईत निरीक्षक एम. एस. गरुड, उपनिरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक एल. एन. पाटील, सहायक निरीक्षक एस. आर. ठोंबरे, जवान बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास किरण पाटील करीत आहेत.
कोल्हापुरातील टिक्केवाडीत सहा लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:41 IST