शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांचे ६ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:47 AM

farmar, flood, kolhapurnews जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी, महापूर, परतीचा पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार ७६२ शेतकऱ्यांचे ६ कोटी ९ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ६३९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यात २३८२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांचे ६ कोटींचे नुकसान पावसाचा फटका : अंतिम अहवाल : ६३९१ हेक्टरक्षेत्र बाधित

कोल्हापूर : जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी, महापूर, परतीचा पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार ७६२ शेतकऱ्यांचे ६ कोटी ९ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ६३९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यात २३८२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.यंदा मान्सून वेळेत सुरू झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली. त्यानंतर खरीप पिकांना पोषक असाच पाऊस झाल्याने वाढ जोमात झाली. मात्र, यावर्षी तीनवेळा महापूर आला, आठ दिवस अतिवृष्टी झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले.

ढगफुटीने शिवारे तुटून गेली. त्यानंतर पिके काढणीस आल्यानंतर परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने हाता-तोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली. गेल्या चार महिन्यांत झालेल्या नुकसानीचा पंचनाम्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. भरपाईसाठी अहवाल तातडीने शासनाकडे पाठविला जाणार आहे.

जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले ६३९१ हेक्टर क्षेत्र आहे. प्रतिहेक्टर ६८०० रुपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांना ६ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग, भाजीपाला उत्पादक ९१ शेतकऱ्यांचे २६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. दोन्ही मिळून ६३९१ हेक्टरवरील पिकांचे ६ कोटी ९ लाख २३ हजारांचे नुकसान झाले आहे.शेतजमीन वाहून जाऊन २३ हेक्टर नुकसानढगफुटीमुळे पन्हाळा तालुक्यात २३ हेक्टर शेतजमीन तुटून गेल्याने २ लाख ८३ हजारांचे नुकसान झाले आहे. प्रतिहेक्टर १२ हजार २०० रुपये अनुदान मिळणार आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान असेतालुका ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान हेक्टर शेतकरी अनुदान लाखात

  • करवीर ५६६.८६ ४४६५ ६३.७९
  • कागल २८७.६८ २१०५ २१.०५
  • राधानगरी ४१०.८३ ४९७८ ५२.९७
  • गगनबावडा १०४.०६ १६०३ १७.३६
  • पन्हाळा ९४३.२६ ७५१३ ७०.०५
  • शाहूवाडी ६३७.३७ १०,०१६ ९९.४७
  • हातकणंगले २७४.९८ १३८७ २०.५१
  • शिरोळ ५५२.६८ २५४० ३९.३४
  • गडहिंग्लज १४५.०१ १३०५ १३.०५
  • आजरा ७४.०६ ५८६ ८.८२
  • चंदगड २३८२.४० १९,१५७ २०१.७३
  • भुदरगड १२.०४ १०७ १.०९

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर