शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

५७ कोटींचे गौडबंगाल, कोल्हापूर जिल्हा परिषदेची भिस्त पोलिस तपासांवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:12 IST

अहवालात फक्त वर्णन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची तीन बनावट धनादेशांच्या माध्यमातून ५७ कोटींची फसवणूक करण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर झाला असला तरी त्यामध्ये कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेचीही भिस्त पोलिस तपासांवरच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.बनावट धनादेशप्रकरणी जिल्हाधिकारी येडगे यांनी चौकशी समिती नेमली होती. संतोष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, स्थानिक निधी व लेखा विभागाचे सुशीलकुमार केंबळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे हे या समितीचे सदस्य होते. जिल्हा परिषदेच्या जलजीवनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट सदस्य सचिव आहेत. या अहवालामध्ये प्रकरणाची दिनांकानिशी माहिती दिली आहे.बोगस धनादेशाच्या माध्यमातून फसवणूक झाली असल्याचे जिल्हा परिषदेच्याच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर काढण्यात आलेले १८ कोटी ४ लाख रुपये कसे मिळविले आणि उर्वरित दोन्ही धनादेश वटण्याची प्रक्रिया कशी थांबविली याचीच माहिती अहवालात आहे. भविष्यात फसवणूक होऊ नये यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना करणारा हा अहवाल जे झाले ते कुणाच्या चुकीमुळे हे सांगायला तयार नाही. मग कुणाच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी हा अहवाल केला अशीही चर्चा आहे.

सर्व धनादेश पुस्तके रोखपालाकडे नकोतमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता १९६८ मधील नियम २६ २ नुसार धनादेश पुस्तके विभागप्रमुख किंवा यथास्थिती गटविकास अधिकारी यांच्या अभिरक्षेत कुलुपंबद करून ठेवणे आवश्यक आहे. धनादेश पुस्तकांची संख्या आणि प्रत्येक पुस्तक उपयोगात आणले जाईल. त्याप्रमाणे त्यात असलेल्या धनादेशांची संख्या वेळोवेळी सहकारी बॅंकेस अधिसूचित करणे आवश्यक आहे. रोखपालास एकावेळी फक्त एकच धनादेश पुस्तक दिले जाईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. बँकेकडून घेतलेली धनादेश पुस्तके रोखपाल यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे.

तपास करण्याचे जे अधिकार पोलिसांना आहेत ते अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाहीत. पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, अनेक पथके शोध घेत आहेत. त्यातूनच निश्चित काही ते समोर येईल. वित्त विभागातील कार्यपद्धतीमध्ये अधिक दक्षता घेण्यासाठी हा अहवाल उपयुक्त ठरेल. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदPoliceपोलिस