कोल्हापूर जिल्ह्यातून मुद्रांक शुल्काद्वारे ५१४ कोटी शासनाच्या तिजोरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 19:20 IST2025-03-31T19:20:19+5:302025-03-31T19:20:35+5:30

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातून या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी-विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून २६ मार्चअखेर ५१४ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत ...

514 crores in government treasury through stamp duty from Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातून मुद्रांक शुल्काद्वारे ५१४ कोटी शासनाच्या तिजोरीत

कोल्हापूर जिल्ह्यातून मुद्रांक शुल्काद्वारे ५१४ कोटी शासनाच्या तिजोरीत

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातून या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी-विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून २६ मार्चअखेर ५१४ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदीचे व्यवहार होत असल्याने रविवारी सार्वजनिक सुटी असताना दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होते. मात्र, एका दिवसात जिल्ह्यातून मुद्रांकामधून किती महसूल संकलित झाला हे वेबसाइटच्या तांत्रिक दोषामुळे सांगता येणार नाही, असे जिल्हा मुद्रांक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

१ एप्रिल ते ३१ मार्च २०१४ अखेर मुद्रांक विभागाचे आर्थिक वर्षे असते. गेल्या वर्षी जिल्ह्याला शासनाकडून ५२५ कोटींचे मुद्रांकाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ५२९ कोटींचा महसूल संकलित झाला होता. यंदा शासनाकडून ६४० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

सोमवारी ३१ मार्च आहे. मात्र, रविवारी पाडवा असल्याने घर, शेती व इतर व्यवहार मुहूर्तावर करतात. म्हणून दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होते. यामुळे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसभर गर्दी होती. यंदा २६ मार्चपर्यंत ५१४ कोटींचा महसूल संकलित झाला आहे. यामध्ये चार दिवसांचा महसूल अजून वाढणार आहे. वाढला तरी शासनाने दिलेले उद्दिष्ट यंदा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: 514 crores in government treasury through stamp duty from Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.