जिल्हा पोलीस दलात ५१ नवी वाहने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:13+5:302021-04-14T04:22:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गस्तीसाठी चारचाकी व दुचाकी अशा ५१ वाहनांचा ताफा मंगळवारी जिल्हा पोलीस दलात दाखल झाला. ...

51 new vehicles filed in district police force | जिल्हा पोलीस दलात ५१ नवी वाहने दाखल

जिल्हा पोलीस दलात ५१ नवी वाहने दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गस्तीसाठी चारचाकी व दुचाकी अशा ५१ वाहनांचा ताफा मंगळवारी जिल्हा पोलीस दलात दाखल झाला. गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ही गस्तीसाठी वाहने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना समारंभपूर्वक प्रदान केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई हे प्रमुख उपस्थिती होते. पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला.

पोलीस मैदानावर संबंधित वाहनांचे पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते पूजन झाले. त्या वाहनांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवून सेवक त दाखल केले. या वाहनांच्या ताफ्यामुळे पोलीस दलात ऊर्जा निर्माण झाली. गुन्हेगारी कमी करण्यास व पीडितांना वेळीत मदत पोहोचविण्याचे काम या वाहनांमुळे वेळेत केले जाणार आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड, शहर पोलीस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

मदतीसाठी १०० अगर ११२ ला फोन करा...

वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासह पीडितांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने ऑनलाईन गस्त प्रणाली कार्यान्वित केली. याचे सेंटर मुंबई व नागपूर येथे आहे. जिल्ह्यात ज्या भागात गस्त आवश्‍यक आहे त्या ठिकाणी ‘क्‍यूआर कोड’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ही गस्त घालण्यासाठी १६ चारचाकी व ३५ दुचाकी जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्या. शहरासह इचलकरंजी येथे पोलीस ठाण्यांतर्गत बीट मार्शलची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्फत २५० ठिकाणी या वाहनांतून गस्त घातली जाईल. येथील क्‍यूआरकोडवर स्कॅनकरून त्याच्या नोंदी पोलीस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. त्यांनी १०० अगर ११२ या क्रमांकावर संपर्क साधल्यास येथे तत्काळ गस्त पथक दाखल होईल असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

पर्यटकांनाही मदतीचा हात...

गस्तीसाठी पुरविलेली वाहने शहरातील मुख्य मार्गावर, चौकात राहणार आहेत. यातील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना येणाऱ्या अडचणी इतर मार्गदर्शनाचेही काम करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

(फोटोही स्वतंत्र फाईल पाठवत आहे)

Web Title: 51 new vehicles filed in district police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.