शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur Crime: रोज एक टक्का परताव्याच्या आमिषाने ४९ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:30 IST

सूत्रधार स्वत:हून पोलिसांसमोर हजर

कोल्हापूर : शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणुकीवर रोज एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत स्वप्नजा पोवार (रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि अमोल कुलकर्णी (रा. जळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल झाला. या फसवणुकीला सर्वस्वी आपणच जबाबदार असून, स्वप्नजा पोवार हिचे नाव फिर्यादीतून कमी करावे, अशी मागणी कुलकर्णी याने सोमवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत केली.याबाबत अधिक माहिती अशी की, गुंतवणुकीच्या ऑनलाइन चर्चासत्रातून कुलकर्णी आणि पोवार यांनी ओळख झाली होती. त्यातून या दोघांनी गुंतवणूकदारांना रोज एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील सुमारे १०० गुंतवणूकदारांची एक कोटी ४५ लाखांची गुंतवणूक करून घेतली. मे २०२२ ते सप्टेंबर २०२२ या काळात परतावा दिला. त्यानंतर परतावे रखडले.याबाबत डॉ. अभिजित नारायण जाभळे (वय ४५, रा. मिठारी मळा, रंकाळा पश्चिम, कोल्हापूर) यांनी मार्च २०२३ मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एकूण १८ गुंतवणूकदारांची सुमारे ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा उल्लेख त्यांनी फिर्यादीत केला असून, गुंतवणूक घेणारी महिला स्वप्नजा पोवार हिला मुख्य संशयित आरोपी बनवले आहे. याबाबत कुलकर्णी याने पत्रकार परिषद घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातून पोवार या महिलेचे नाव कमी करण्याची विनंती पोलिसांना करणार असल्याचे सांगितले.

फसवणूक ४९ लाखांची की १८ लाखांची?फिर्यादी डॉ. जांभळे यांनी ४९ लाखांची फसवणूक झाल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. मात्र, अमोल कुलकर्णी याने गुंतवणूकदारांचे केवळ १८ लाख देणे शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे फसवणूक ४९ लाखांची झाली, की १८ लाखांची झाली? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

सूत्रधारच हजरपोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांधील सूत्रधार पोलिस आणि गुंतवणूकदारांपासून पळ काढतात. मात्र, अमोल कुलकर्णी हा स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. शिवाय पत्रकार परिषद घेऊन तो दुसऱ्या संशयिताचे नाव फिर्यादीतून काढण्याची विनंती करीत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस