शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या उलाढालीत गतवर्षात ४६५ कोटींनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:00 IST

दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यातही वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची गेल्या वर्षभरात उलाढालीत ४६५ कोटींनी वाढ झाली आहे. नफ्यातही ८५ लाखांची वाढ झाली असून २९ सप्टेंबरला संघाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे.‘गोकुळ’ दुधाची चव व गुणवत्तेमुळे मुंबईसह पुण्यात दुधाला खूप मागणी आहे. दिवसेंदिवस मागणी वाढत असतानाच म्हैस दूध कमी पडू लागल्याने संघाने २० लाख लिटरचा संकल्प करत त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरात दैनंदिन दूध संकलनात तब्बल दीड लाख लिटरची वाढ झाली आहे. त्याचबरोबर विक्रीतही वाढ झाल्याने एकूणच संघाची उलाढाल वाढली आहे. संघाने ३१०६ कोटी उलाढालींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये ४६५ कोटींची वाढ झाली आहे. दरम्यान, संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता महासैनिक दरबार हॉल येथे होणार आहे.

उत्पादकांच्या पदरात ३७१ कोटी जादा

संघाची उलाढाल वाढली असतानाच दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यातही वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात २४७४ कोटींचा परतावा शेतकऱ्यांना दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७१ कोटी जादा रक्कम आहे.

पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरण होणारवार्षिक सर्वसाधारण सभेत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरणाचा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे. पशुखाद्याची मागणी वाढत असताना त्यापटीत उत्पादन करण्याचा हेतू संघाचा आहे.

गाय दूध विक्री दरात वाढ

 

 

गोकुळने गाय दूध विक्री दरात प्रतिलीटर दोन रुपये आज, गुरुवार पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टोण्ड व गाय दूध प्रतिलीटर ४६ रुपये तर प्रमाणित दूध ५२ रुपये लीटर होणार आहे.

दूध उत्पादनात झालेली घट व बाजारपेठेतील मागणी पाहून ‘गोकुळ’ने पंधरा दिवसांपूर्वी म्हैस दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ केली होती. गाय दूध खरेदी दरात प्रतिलीटर रुपयाची वाढ केली होती, मात्र विक्री दरात वाढ केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ‘अमूल’ ने विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. श्रावण महिना, उपवास, सणामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यात ‘गोकुळ’ ने गाय दूध खरेदी दरात वाढ करूनही विक्री वाढवली नव्हती. त्यामुळे विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

अशी झाली गाय दूध दरात वाढ, प्रतिलीटर -दूध          पूर्वीचा दर     नवीन दरटोण्ड       -४४ रुपये    - ४६ रुपयेगाय दूध   -४४ रुपये     -४६ रुपयेप्रमाणित   -५० रुपये     -५२ रुपये

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ