विधानसभेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ४४ हजार मतदार, सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:29 IST2025-04-05T16:29:30+5:302025-04-05T16:29:49+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल ४४ हजार ४४३ मतदारांची वाढ झाली आहे. यात शिरोळमध्ये सर्वाधिक ...

44 thousand more voters in Kolhapur district after assembly elections | विधानसभेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ४४ हजार मतदार, सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात.. जाणून घ्या

विधानसभेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ४४ हजार मतदार, सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात.. जाणून घ्या

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल ४४ हजार ४४३ मतदारांची वाढ झाली आहे. यात शिरोळमध्ये सर्वाधिक ६ हजार ८७३ मतदार वाढले आहेत. विधानसभेवेळी जिल्ह्यात ३४ लाखांवर मतदार होते. मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत.

गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली. तसेच २० ते २९, २९ ते ४० या वयोगटातील मतदारही वाढले. शिवाय कोल्हापूरला लाभलेल्या विचारांमुळे जिल्हा मतदानात राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला. निवडणुका संपून आता चार महिने होऊन गेले. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४४ हजार मतदार वाढले आहेत.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती वाढले ?

विधानसभा नवीन मतदार स्थलांतरित मतदार वाढलेले 
चंदगड ३३८६ १६३ ३५४९
राधानगरी ३९०९ ८७ ३९९६
कागल ३३८४ २१८ ३६०२
कोल्हापूर दक्षिण ४६९१ ५८९ ५२८०
करवीर ४०३८ १०८ ४१४६
कोल्हापूर उत्तर २५७७ २८० २८५७
शाहुवाडी ३९९१ ९९ ४०९०
हातकणंगले ४९१४ १०८ ५०२२
इचलकरंजी ४२४४ २४१ ४४८५
शिरोळ ६८७३ ५४३ ७४१६

Web Title: 44 thousand more voters in Kolhapur district after assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.