कोल्हापूर : काेल्हापूर महापालिकेच्या रिंगणात २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ८१३ इच्छुकांची अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये ४४ माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. महाविकास आघाडीकडून २२ तर महायुतीकडून २० जणांनी शड्डू ठोकला आहे. इतर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. पाच ठिकाणी माजी नगरसेवकांमध्ये थेट झुंज होत असून येथे सर्वच ठिकाणी उमेदवारांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.महापालिकेसाठी इच्छुकांची संख्या आणि आघाडी, महायुतीमुळे उमेदवारी देण्यावर आलेल्या मर्यादा पाहता, सर्व नेत्यांची दमछाक झाली आहे. नेत्यांचा आदेश डावलून अनेकांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. गेली अनेक वर्षे महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या माजी नगरसेवकांबरोबरच नवीन इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. आता नाहीतर पाच वर्षे थांबायला लागणार म्हणून अनेकांनी पक्ष व नेत्यांवरील निष्ठा बाजूला सारून रिंगणात उतरले आहेत.
माजी नगरसेवकांमधील बिग फाईट...प्रभाग ०६ (ड)- नंदकुमार मोरे व प्रतापसिंह जाधवप्रभाग ०९ (ड) - राहुल माने व शारंगधर देशमुखप्रभाग १२ (ड) - आदिल फरास व ईश्वर परमारप्रभाग १४ (ड)- विनायक फाळके व अजित मोरेप्रभाग १४ (क) - प्रकाश नाईकनवरे व अमर समर्थ
हे माजी नगरसेवक आहेत रिंगणात...सुभाष बुचडे, स्वाती यवलूजे, राहुल माने, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, ईश्वर परमार, विनायक फाळके, संजय मोहिते, प्रवीण केसरकर, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, राजू दिंडोर्ले, प्रकाश पाटील, राजेश लाटकर, अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, उमा बनछोडे, इंद्रजित बोद्रे, तेजस्विनी घोरपडे, दत्ताजी टिपुगडे, दिलीप पोवार, स्मिता माने, माधवी गवंडी, नंदकुमार मोरे, अनुराधा खेडकर, शारंगधर देशमुख, महेश सावंत, यशोदा मोहिते, माधुरी नकाते, हसीना फरास, आदिल फरास, नियाज खान, प्रकाश नाईकनवरे, अजित मोरे, विलास वास्कर, मुरलीधर जाधव, मायादेवी भंडारी, विजय सरदार, राहुल चव्हाण.
Web Summary : Kolhapur Municipal elections see 44 former councilors vying for 81 seats. Key battles include contests in wards 6, 9, 12, and 14, raising stakes for candidates and leaders alike as political loyalties are tested.
Web Summary : कोल्हापुर नगर निगम चुनावों में 44 पूर्व पार्षद 81 सीटों के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। वार्ड 6, 9, 12 और 14 में प्रमुख मुकाबले हैं, जिससे उम्मीदवारों और नेताओं दोनों के लिए दांव बढ़ गया है क्योंकि राजनीतिक निष्ठा की परीक्षा हो रही है।