शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- ‘राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, दुरंगी लढत होणार; आज चिन्हांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:51 IST

सभामध्ये एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी धडाडणार

कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या २१ जागांसाठी आता ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही गटांत सरळ दुरंगी लढत होणार आहे. गट क्रमांक ५ मध्ये १ व अनुसूचित जाती जमाती गटामध्ये १ असे दोन उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. दरम्यान, आज, गुरुवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या पंधरा दिवसांच्या मुदतीत एकूण १०६ जणांनी माघार घेतली. बुधवारी माघार घेण्याचा अखेरचा दिवस होता. हातकणंगले, करवीर, पन्हाळा ,राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या राजाराम कारखान्याचे १३ हजार ५३८ सभासद आहेत. त्यामध्ये १२९ ''ब'' वर्ग सभासदांचा समावेश आहे.गट क्रमांक पाच व अनुसूचित जाती जमाती गटवगळता सर्व गटांत दुरंगी लढत होणार आहे. राजारामसाठी २३ एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून २५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे काम पाहत आहेत.दरम्यान, दोन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे प्रचाराला आता अधिकच रंगत येणार आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक व विरोधी गटाचे नेते माजी आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार यंत्रणा अधिकच सक्रिय केली आहे. येत्या आठ दिवसांत दोन्ही गटांच्या जाहीर सभा ही मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या सभामध्ये एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी धडाडणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक