शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

गोकुळ दूध संघामध्ये ४२९ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:35 AM

कोल्हापूर : गाईच्या वाढत्या दुधाच्या हाताळणीमुळे ‘गोकुळ’ला तोटा होत असताना, नवीन ४२९ कर्मचारी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे वर्षाला दूध उत्पादकांचे ११ कोटी रुपये पगारापोटी खर्च होणार आहेत. याची खरोखरच गरज आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.शासनाच्या निर्णयानंतरही गाईच्या दूध ...

कोल्हापूर : गाईच्या वाढत्या दुधाच्या हाताळणीमुळे ‘गोकुळ’ला तोटा होत असताना, नवीन ४२९ कर्मचारी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे वर्षाला दूध उत्पादकांचे ११ कोटी रुपये पगारापोटी खर्च होणार आहेत. याची खरोखरच गरज आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.शासनाच्या निर्णयानंतरही गाईच्या दूध खरेदी दरात कपात केल्याप्रकरणी विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी बुधवारी ‘गोकुळ’च्या संचालकांना अपात्र का करू नये, अशी नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली. आमदार पाटील म्हणाले, किमान नोटीस काढली म्हणून पहिल्यांदा शासनाचे अभिनंदन करतो. आता योग्य प्रकारे चौकशी करून शासनाने संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. ‘गोकुळ’ने २०२० पर्यंत रोज २० लाख लिटर दुधाची हाताळणी करण्यासाठी आणखी ४२९ पदे भरण्याची शासनाकडून मंजुरी घेतली आहे. मात्र, एकूणच या भरतीला आपला आक्षेप आहे.आपली भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, मुळात गाईचे दूध वाढत असताना, या हाताळणीमुळे ‘गोकुळ’ला तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना मग पुन्हा नोकरभरती गरजेची आहे का, ती करणे खरोखरच गरजेचे आहे का, याची चौकशी शासनाने केली पाहिजे. सातारा, पुणे जिल्हा बँकेने ज्या पद्धतीने जाहिराती देऊन कर्मचारी भरती केली आहे. त्या पद्धतीने वृत्तपत्रांना जाहिराती देऊन ही भरती झाली पाहिजे. या भरतीमुळे वर्षाला सुमारे ११ कोटी रुपये बोजा पडणार असून, हा खर्च दुध उत्पादकांच्याच माथ्यावर पडणार आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी यावेळी या कर्मचारी भरतीमध्ये लाखो रुपयांची चर्चा सुरू असून, १०, १२ दूध संस्थांचे ठराव एकत्र आणल्यास एक जागा या पद्धतीनेही नोकरभरतीची आश्वासने दिली जात असल्याचा आरोप केला. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, कुंभी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, सरवडेचे विजयसिंह मोरे उपस्थित होते.‘गोकुळ’च्या चौकशीबाबतजानकर यांना स्मरणपत्रआमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’मधील भ्रष्ट कारभाराची, लेखापरीक्षण अहवाल आणि बेकायदेशीर वार्षिक सर्वसाधारण सभेची शासनाने चौकशी करावी अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी केली होती. यावेळी दोन तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आश्वासन पशूसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. आय. ए. एस. अधिकाºयाकरवी या सर्व मुद्द्यांची चौकशी करावी यासाठी जानकर यांना पहिले स्मरणपत्र १४ एप्रिलला पाठविण्यात आले आहे.शेतकºयांना फसवलं हे तरी जाहीर करा...!गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचे आदेश शासनाने दिले असताना ‘गोकुळ’सह अनेक संघांनी या आदेशाचे पालन केले नाही. यावर सरकार या संघांवर कारवाई करीत नाही. एक तर शासनाने संघांना दरवाढ देणे बंधनकारक करावे न केल्यास कारवाई करावी. तेही जमत नसल्यास आम्ही शेतकºयांना फसविले, हे तरी जाहीर करावे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.अध्यक्षांच्या दारात जनावरांसह बसणार‘गोकुळ’ला मिळणाºया रुपयातील ७० पैशांहून अधिक पैसे आम्ही शेतकºयांवर खर्च करतो, असे वारंवार अध्यक्ष सांगत असतात; परंतु हे खोटे आहे. आता पुन्हा त्यांनी जर हेच सांगायला सुरुवात केली तर जनावरांसह त्यांच्या दारात ठिय्या मारणार असल्याचे बाबासाहेब देवकर यांनी सांगितले. काही संचालकांकडे एक गाय आणि म्हैसही नाही त्यांना दूध उत्पादकांचे दुखणे काय कळणार ? असाही प्रश्न देवकर यांनी उपस्थित केला.