शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर!, ५ ब्रासपर्यंत मिळणार मोफत वाळू; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:32 IST

जिल्हाधिकारी कार्यालय कालबद्ध कार्यक्रम राबविणार

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ४१ हजार ४२८ जणांना मिळणार आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहे.

घरकुल आवास योजनेच्या एकूण ६१५ लाभार्थ्यांपैकी ५०८ लाभर्थ्यांना २५४३.०४ ब्रास इतक्या वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित १२७ लाभार्थ्यांना ४२५ ब्रास वाळू वितरित करण्यात येणार आहे. इचलकरंजी येथील कट्टीमळा जॅकवेलपासून ते इचलकरंजी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत असणाऱ्या तालुकास्तरीय संनियंत्रण समितीने शिफारस केलेल्या गट नं. २७४, २७३, २७१, २५६, २५५, परिमाण ८८२५ ब्रास असे एकूण १० गटांतील एकत्रित २०,८२५ ब्रास इतक्या अंदाजित परिमाणामध्ये गाळ व गाळमिश्रित वाळूउपसा करण्याबाबत १६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार कार्यवाही करण्यास मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत पंचगंगा नदीचे खोलीकरण करण्यासाठी जलसंपदा विभागाने निर्देश दिले आहेत.कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभागाचे अधिकारी तसेच पाटबंधारे कार्यालय यांच्या समन्वयातून या लाभार्थ्यांना ही वाळू मोफत मिळणार आहे. दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार आणि दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णय आणि भारत सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या दिनांक २८ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक नसलेल्या प्रकरणांची तत्काळ निश्चिती करण्यात येणार आहे. यासाठी आठवडाभरात मोहीम सुरू होणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनाही या कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि अडथळ्याविना वाळूचा पुरवठा होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा मॉडेल बनवणारया मोहिमेतून कोल्हापूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येत्या आठ दिवसांत उद्दिष्ट ठेवून एक कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

  • ग्रामीण भागात मंजूर घरकुल : ३९,१४४
  • शहरी भागात मंजूर घरकुल : २२८४
  • एकूण : ४१,४२८
टॅग्स :kolhapurकोल्हापूरsandवाळूHomeसुंदर गृहनियोजनcollectorजिल्हाधिकारी