कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजवर जिल्हा परिषदेसाठी ४२ व पंचायत समितीसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी ८१८ उमेदवारांना १ हजार ५७० उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले.
आजअखेर निवडणूक विभागातून ४२ व निर्वाचन गणातून ४३ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आजअखेर १ हजार ९११ उमेदवारांना ३ हजार ८५१ इतके अर्ज वितरित करण्यात आले आहेत.
वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती, आघाडीतही गोंधळ; बहुरंगी लढती होणार सोमवारी जिल्हा परिषदेसाठी ४१ उमेदवारांनी ५६ अर्ज तर पंचायत समितीसाठी ४२ उमेदवारांनी ५६ अर्ज दाखल केले. सोमवारी राधानगरी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ७ उमेदवारांनी १५ तर पंचायत समितीसाठी १५ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज भरले.
सोमवारी तालुकानिहाय अर्ज भरलेले उमेदवार (कंसात अर्जांची संख्या)तालुका : जिल्हा परिषद : पंचायत समितीशाहुवाडी : ५ (५) : ४ (४)पन्हाळा : ३ (३) : ०हातकणंगले : ४ (५) : १ (१)शिरोळ : १ (१) : ३(३)करवीर : ५ (८) : १ (१)गगनबावडा : ० : ०राधानगरी : ७ (१५) : १५ (२८)कागल : ४ (५) : ५ (६)भुदरगड : ५ (६) : ११ (११)आजरा : १ (२) : ०गडहिंग्लज : ५ (५) : २ (२)चंदगड : १ (१) : ०एकूण : ४१ (५६) : ४२ (५६)
Web Summary : Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections see 83 nominations filed. 3,851 application forms distributed to 1,911 candidates till date. Radhanagari leads in filings.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में 83 नामांकन दाखिल हुए। अब तक 1,911 उम्मीदवारों को 3,851 आवेदन पत्र वितरित किए गए। राधानगरी नामांकन में सबसे आगे।