वर्षभरात ४१ जण जाळ्यात

By admin | Published: January 1, 2016 12:20 AM2016-01-01T00:20:25+5:302016-01-01T00:20:42+5:30

लाचलुचपतची कारवाई : माजी महापौरांसह अधिकाऱ्यांचा समावेश

41 people caught in the year | वर्षभरात ४१ जण जाळ्यात

वर्षभरात ४१ जण जाळ्यात

Next

कोल्हापूर : गत साली लाचलुचत प्रतिबंधक विभागाने माजी महापौर तृप्ती माळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, आदीं ४१ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून स्वीकारलेली आठ लाख ८४ हजार रुपये लाचेची रक्कम जप्त केली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१५ अखेर ३२ ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली आहे. यातील सहाजणांनी लाचेची मागणी केली होती. न्यायालयाने दहाजणांना कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी दिली.
लाचप्रकरणी जिल्ह्यातील ज्या ४१ जणांवर कारवाई झाली आहे त्यामध्ये १२ पोलीस, ११ महसूल विभागातील लाचखोर, तीन पालिका कर्मचारी यांच्यासह कळंबा मध्यवर्ती कारागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, सहकार, शहर भूमीअभिलेख (सिटी सर्व्हे), एमएसईबी या कार्यालयातील प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन लाखांपासून ते ५०० रुपयांपर्यंत लाचेची मागणी केली आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने माजी महापौर तृप्ती माळवी, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे, कळंबा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमराव लादे, सहायक नगर रचनाकार अधिकारी समीर अरविंद जगताप या ‘वर्ग दोन’च्या अधिकाऱ्यांचासह तलाठी, लिपिक, लोकसेवक, खासगी व्यक्त्ािंचा यात सहभाग आहे. तत्कालीन महापौर तृप्ती माळवी यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन मधुकर गडकरी यांच्याकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारतेवेळी सापळा रचून पकडण्यात आले होते. हे प्रकरण फारच गाजले होते.
सरकारी नोकरदाराने लाच स्वीकारली अथवा लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. त्यामध्ये सर्वाधिक पोलीस व महसूल खात्याशी संबंधित आहेत. या कारवाईतून दहाजणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये महसूल विभागातील तहसील कार्यालयातील लिपीक, तलाठी, भूमीअभिलेख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील कारकून, कोतवाल असे सहाजण तसेच सहायक फौजदार, पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस नाईक अशा पोलीस दलातील तीनजणांना आणि एमएसईबीमधील कनिष्ठ अभियंत्याचा शिक्षेमध्ये समावेश
आहे.

कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी. २०१६ ला ४० जणांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट आहे.
- उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग,
कोल्हापूर.


२०११ ते २०१५ सापळा केसीस
वर्ष खटले
२०१११२
२०१२१२
२०१३१५
२०१४३०
२०१५३२

कारवाई दृष्टिक्षेपात
वर्ग एक०१
वर्ग दोन०३
वर्ग तीन२८
वर्ग चार०२
इतर लोकसेवक०१
खासगी व्यक्ती०६
एकूण ४१

Web Title: 41 people caught in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.