कोल्हापूर,सांगलीसाठी गेल्या 7 दिवसात 40 टन मदत साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 06:26 PM2019-08-13T18:26:49+5:302019-08-13T18:29:59+5:30

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. आजअखेर सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

40 tonnes of relief material for Kolhapur, Sangli in last 7 days | कोल्हापूर,सांगलीसाठी गेल्या 7 दिवसात 40 टन मदत साहित्य

कोल्हापूर,सांगलीसाठी गेल्या 7 दिवसात 40 टन मदत साहित्य

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर,सांगलीसाठी गेल्या 7 दिवसात 40 टन मदत साहित्यवायुदलाच्या एमआय 17 हेलिकॉप्टरने शिरोळ पूरग्रस्तांना मोठी मदत

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. आजअखेर सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, कृषी अधिकारी अतुल जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संग्राम धुमाळ, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात, पोलीस दल आणि इतर सहकारी उजळाईवाडी येथील विमानतळावर पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहचवत आहेत.

सकाळी 11 वाजता वायुदलाचे एमआय 17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर शिरोळकडे जाण्यासाठी हवेत झेपावले. हेलिकॉप्टरमध्ये दूध, बिस्किटे व इतर जीवनावश्यक साहित्य उजळाईवाडी येथील विमानतळावर भरण्यात आले. वायुदलाच्या ज्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना सध्या मदत पोहचवण्यात येत आहे, त्यासाठी ग्रुप कॅप्टन श्रीधर, पायलट कृष्णन, सहपायलट नवाज, स्कॉड्रन लिडर संदिप पोवार, फ्लाईट गनर जे.डब्ल्यू गुप्ता, फ्लाईट इंजिनियर साजन गोगोई हे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टरसाठी कार्यरत आहेत.

अवघ्या 15 मिनीटात कुरूंदवाड येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या प्रांगणात हे हेलिकॉप्टर उतरले. या ठिकाणी हेलिकॉप्टरमधील साहित्य उतरून शाळेमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणावरून कुरूंदवाड आणि तेरवाड येथील पूरग्रस्तांसाठी बोटीतून, वाहनातून तर काही ठिकाणी चालत जाऊन ही मदत पूरग्रस्तांपर्यत पोहचवण्यात येत आहे. यानंतर एमआय 17 ने पुन्हा एकदा शिरोळकडे उड्डाण केले.

शिरोळ येथील दत्त नगर येथे उतरल्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे तसेच अन्य साहित्य हेलिकॉप्टरमध्ये भरण्यात आले. हे साहित्य कुरूंदवाड येथे पोहचवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा या हेलिकॉप्टरमध्ये अन्न,पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू भरून हे हेलिकॉप्टर हवेत झेपावले.

कनवाड येथे आल्यानंतर हेलिकॉप्टर एका विशिष्ट उंचीवर खाली आणण्यात आले. परिसरातील पूरग्रस्तांसाठी आतमधील वस्तू खाली सोडण्यात आल्या. पुन्हा हेलिकॉप्टर कवठेगुलंदकडे झेपावले. या ठिकाणी बास्केटमध्ये सर्व वस्तू घालून हे बास्केट खाली सोडण्यात आली. खाली असणाऱ्या पुरग्रस्तांनी बास्केटमधील वस्तू उतरवून घेतल्या. त्यानंतर एमआय 17 पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी कोल्हापूर येथील विमानतळाकडे रवाना झाले.

.... रॉकीचाही सहभाग

बॉम्ब शोधक व नाशक पथकातील रॉकी हा डॉगदेखील आपली सेवा विमानतळावर बजावत
आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही साहित्य पोहचविण्यापूर्वी तसेच ठेवल्यानंतरही तो तपासतो.
आजही त्याने एमआय 17 मध्ये आपली सेवा बजावली. गेल्या 3 दिवसांपासून तो विमानतळावर
सेवा देत आहे. शहरातील महालक्ष्मी मंदिर,विमानतळ ही ठिकाणे रॉकीकडून दररोज तपासली जातात. तसेच रेल्वे स्टेशन, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणीही तो आपली सेवा बजावत असतो. गेल्या 7 वर्षापासून रॉकी पथकात असून त्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक राजन कांबळे हे हँडलर म्हणून काम पाहतात. कागल येथे झालेल्या स्फोटाच्या तपासात रॉकीने मदत केली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास टेके यांनी दिली.
 

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग आणि शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर,राजापूर,कुरूंदवाड व अन्य गावांमध्ये गेल्या 7 दिवसांत 40 टन अन्न-धान्य,वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. काही गावांमध्ये एअर ड्रॉपिंगने तर काही ठिकाणी बास्केटच्या माध्यमातून मदत साहित्य दिले आहे. नौदल, एनडीआरएफ, लष्कर यांची वैद्यकीय पथके तसेच रेस्क्यू टिम यांनाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहचवले आहे.

- संदिप पवार,
स्कॉड्रन लिडर, वायुदल

Web Title: 40 tonnes of relief material for Kolhapur, Sangli in last 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.