शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

३८७ रुग्णालये ‘बेकायदा’

By admin | Updated: July 11, 2015 00:04 IST

‘प्रदूषण नियंत्रण’कडून नोटिसा : प्रक्रिया प्रकल्पाचे सभासद न झाल्यास कारवाईचा इशारा

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -शहर आणि उपनगरांत तब्बल ३८७ रुग्णालये शासनाच्या ‘वैद्यकीय कचरा हाताळणे व व्यवस्थापन १९९८’ या कायद्यानुसार वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट न लावताच अनेक दिवसांपासून बेकायदा सुरू आहेत. संबंधित रुग्णालयांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा जारी केल्या आहेत. एक महिन्यात सामूहिक जैववैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पाचे सभासदत्व स्वीकारून कचरा न दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने दिला आहे. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालयात गेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सांडपाणी, वैद्यकीय कचरा, औद्योगिक सांडपाणी यांचे व्यवस्थापन काटकोरपणे होण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. प्रदूषणाच्या विविध घटकांत वैद्यकीय कचरा अतिशय घातक मानला जातो. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रांतील सर्व रुग्णालयांतील वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया होते की नाही, यावर लक्ष केंद्रित केले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने शहरातील सर्वच रुग्णालयांची माहिती घेतली. प्रत्येक रुग्णालयातील रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, त्याची माहिती घेतली. त्यावेळी शहरातील ९१७ रुग्णालयांतील ८६५ किलो वैद्यकीय कचरा ‘नेचर इन नीड’ या प्रक्रिया प्रकल्पाला, तर इचलकरंजी शहर आणि परिसरातील ३४१ रुग्णालयांचा रोजचा २५० किलो कचरा एस. एस. सर्व्हिसेस प्रकल्पाला प्रक्रियेसाठी जातो, असे आढळून आले. दरम्यान, शहरातील ३८७ रुग्णालये ‘नेचर इन नीड’ या सामूहिक जैववैद्यकीय व्यवस्थापन प्रकल्पाकडे सभासद नसून कचराही देत नसल्याचे उघडकीस आले. कायद्यानुसार सामूहिक कचरा प्रकल्पाचे सभासद न होता कचराही देत नसणारी रुग्णालये बेकायदा असल्याचे प्रथमदर्शनी आरोग्य आणि प्रदूषण प्रशासनाच्या निदर्शनास आले. बहुतांश रुग्णालये उघड्यावर कचरा टाकतात असा संशय आहे. त्यामुळे ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने सर्व ३८७ रुग्णालयांना नोटीस दिली. नोटीस दिलेल्यांत काही डॉक्टरांनी रुग्णालय बंद केले आहे, असे उत्तर दिले आहे. बुधवारी (दि. ८) पर्यावरणवादी, मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, आरोग्य विभाग यांची बैठक झाली. यावेळी ३८७ पैकी सुरू असलेल्या सर्व रुग्णालयांनी सामूहिक जैवकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्पाचे सभासद एका महिन्यात घेऊन कचरा देणे सुरू करावे, अन्यथा कडक कारवाई करण्याचा निर्णय झाला.शहरातील ३८७ रुग्णालयांचे सामूहिक जैववैद्यकीय व्यवस्थापन प्रकल्पाकडे सभासदत्व नसून ती कचराही देत नाही. त्यामुळे या संबंधित रुग्णालयांना नोटीस दिली आहे. त्यांनी सभासदत्व न घेतल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. - मनीष होळकर, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारीप्रक्रिया प्रकल्पाचे सभासदत्व न घेतलेल्या ३८७ रुग्णालयांची छाननी काटेकोरपणे करण्याची मागणी केली आहे. एका महिन्यात जे प्रक्रिया प्रकल्पाचे सभासदत्व घेऊन कचरा देणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.- उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरणवादीबड्या रुग्णालयांचा सहभागसामूहिक वैद्यकीय कचरा प्रकल्पाकडे सभासदत्व न घेतलेल्यांमध्ये १०० खाटांच्या एका आणि ५० खाटांच्या दुसऱ्या रुग्णालयाचा समावेश आहे. उर्वरित सर्व रुग्णालये ५० खाटांच्या आतील आहेत. यातील काही रुग्णालयधारक नोटिसीला केराची टोपली दाखवितात. ते कारवाईच्या इशाऱ्याला जुमानत नाहीत, राजकीय दबाव आणतात, असे दिसून आले आहे.