शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: नगरपालिकांच्या आखाड्यात... कोल्हापूर जिल्ह्यात ३८४ महिला रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:38 IST

नगराध्यक्षपदासाठी २८ महिलांमध्ये चुरस : खुल्या प्रवर्गातूनही उमेदवारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका, ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीत १३४ जागांसाठी ३८४ महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी २८ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी महिला आरक्षित नगराध्यक्षपद वगळता फक्त आजरा आणि वडगाव या दोन ठिकाणी महिला खुल्या गटातून आपली राजकीय ताकद आजमावत आहेत.जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. २) मतदान होत आहे. बुधवारी अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आता या राजकीय आखाड्यातील रंगत वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के जागा महिला आरक्षित आहेत. नगराध्यक्षपदासाठी ६ नगरपालिकांमध्ये महिला आरक्षण आहे.नगराध्यक्षपद आणि सदस्यपद अशा दोन्ही गटांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या सर्व गटांमध्ये मिळून १३४ जागांवर महिलाराज असणार आहे. त्यासाठी ३८४ महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर एकूण २६३ जागांसाठी महिला व पुरुष मिळून ८४० जण निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यात ४५६ पुरुष उमेदवार आहेत.

  • नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये एकूण जागा : २६३
  • महिला आरक्षित जागा : १३४
  • नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण : ६

आरक्षणाच्या ठिकाणीच उमेदवारीआजवरच्या अनुभवानुसार ज्या ठिकाणी नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे त्याच ठिकाणी महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अन्यथा हुपरी, जयसिंगपूर, हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकही महिला उमेदवार रिंगणात नाही. आजरा आणि वडगाव येथे नगराध्यक्षपद खुले असल्याने येथे मात्र अनुक्रमे ६ आणि २ महिला निवडणूक लढवत आहेत.

नगरपालिका : एकूण उमेदवार : महिला उमेदवार : नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारहुपरी : ९२ : ५० : ०मलकापूर : ८६ : ३२ : ३जयसिंगपूर : ८३ : ३७ : ०हातकणंगले : ७८ : १४ : ०शिरोळ : ७१ : ३६ : ४ (अनुसूचित जाती महिला)कुरुंदवाड : ६५ : ३१ : ४कागल : ६३ : २८ : ५आजरा : ५७ : ३२ : ६चंदगड : ५७ : २६ : ०गडहिंग्लज : ५१ : २६ : ०वडगाव : ४८ : २५ : २पन्हाळा : ४४ : २२ : २मुरगूड : ४५ : २५ : २एकूण : ८४० : ३८४ : २८

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Local Body Elections: 384 Women Contesting, Fierce Competition

Web Summary : Kolhapur witnesses intense local body polls. 384 women are contesting for 134 seats across ten municipalities. 28 women vie for mayor posts, primarily in reserved categories. Ajra and Vadgaon see women challenging open seats.