शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिरढोणच्या लक्ष्मी संस्थेत ३७ लाखांचा अपहार, चौघांना अटक; अध्यक्षासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:33 IST

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेमध्ये सचिव अनिल भाऊसो पोवार (मयत, रा. टाकवडे, ता. शिरोळ) ...

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेमध्ये सचिव अनिल भाऊसो पोवार (मयत, रा. टाकवडे, ता. शिरोळ) यांनी गैरव्यवहार करून ३७ लाख ८९ हजार ९९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोवार यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सोहेल बाणदार व सर्व संचालक असे एकूण १३ जणांविरोधात लेखापरीक्षक सागर सदाशिव सुतार (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिल्याने सहकारात खळबळ उडाली आहे.२०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले असून, याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष बाणदार, संचालक भाऊसो चौधरी, महावीर नारगुडे व समीर मुजावर अशा चौघांना अटक केली आहे. उर्वरित संचालक फरार आहेत.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अध्यक्ष बाणदार यांच्यासह भाऊसो चौधरी, धोंडीराम नागणे, देवगोंडा पाटील, सतीश अडगाणे, विकास तणपुरे, महावीर नारगुडे, आनंदा चौगुले, अरुण ऐनापुरे, समीर मुजावर, एकनाथ कांबळे, वर्षा गुरवान यांचा समावेश आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मी विकास संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेवर बाणदार गटाची सत्ता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संस्थेत अपहाराची चर्चा होती. संस्थेचे सचिव अनिल पोवार यांनी काही महिन्यांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अपहाराच्या चर्चेला ऊत आला होता.शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक सुतार यांनी संस्थेचे नुकतेच लेखापरीक्षण केले असून सचिव पोवार यांनी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या सालात सभासदांनी कर्जाची भरलेली रक्कम संस्थेत जमा न करता २७ लाख २ हजार ९९ रुपये, जमीन खरेदीपोटी मंजुरीविना १० लाख रुपये व संस्थेमध्ये अनामत रक्कम नसताना रोख ८७ हजार रुपये असे एकूण ३७ लाख ८९ हजार ९९ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या अपहाराला जबाबदार धरून अध्यक्षासह सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस