Chartered Accountant: कोल्हापूरचे ३४ जण सीए, आसिम मेमन विभागात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:51 IST2025-11-04T11:51:01+5:302025-11-04T11:51:33+5:30

कोल्हापुरमधील २४९ विद्यार्थ्यांमधून ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले

34 people from Kolhapur pass the final exam of the Chartered Accountants course | Chartered Accountant: कोल्हापूरचे ३४ जण सीए, आसिम मेमन विभागात पहिला

Chartered Accountant: कोल्हापूरचे ३४ जण सीए, आसिम मेमन विभागात पहिला

कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापुरमधील २४९ विद्यार्थ्यांमधून ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळवत सीए झाले आहेत. यापैकी कोल्हापूर विभागातून आसिम सादिक मेमन यांनी प्रथम क्रमांक, अभिमान गुरुबाळ माळी यांनी द्वितीय, ऋतुराज विनायक दाबाडे यांनी तृतीय तर सुष्मिता सूर्यकांत काटकर यांनी चौथा क्रमांक मिळवला.

या परीक्षेत चैत्रा राघवेंद्र मुजुमदार, श्रीकांत अनिल महाजन, आकांक्षा कृष्णा पाटील, प्रथमेश श्रीनिवास गोगवेकर, ऋषिकेश अरुण पोवार, नमिता दीपक गाडवे, पूनम सागर उपाध्ये, रसिका मोहन पाटील, अपूर्व रत्नाकर हजारे, दर्शनी संतोष तोडकर, साक्षी श्रीकांत झंवर, दिगंबर बापूसाहेब पाटील, जान्हवी कृष्णाजी करमरकर, ओंकार संतोष सामंत, आदित्य रमाकांत काजरेकर, राजकुमार मसवडे, श्यामसुंदर मालू, श्रुती हरीशचंद्र गाट, मानसी गुरुप्पा कर्पट्टी, 

ज्योतिबा विठ्ठल पाटील, यश प्रताप पाटील, प्रियांका सावंत, ईशा शेखर गाटे, जान्हवी संजय पावसकर, संजना अनिल दरयानी, मिथ गांधी, सूरज पांडुरंग पाटील, बिपाशा शेख, पूजा लटकन आणि तुषार सुभाष घराळ हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेचे मार्गदर्शन मिळाल्याचे आयसीआय कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष नितीन हरगुडे यांनी सांगितले.

Web Title : कोल्हापुर में खुशी: 34 सीए बने, आसिम ने डिवीजन में टॉप किया!

Web Summary : कोल्हापुर में अंतिम परीक्षा के बाद 34 नए चार्टर्ड अकाउंटेंट बने। आसिम मेमन ने कोल्हापुर डिवीजन में पहला स्थान हासिल किया। इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया की कोल्हापुर शाखा ने मार्गदर्शन प्रदान किया।

Web Title : Kolhapur Cheers: 34 Qualify as CAs, Asim Tops Division!

Web Summary : Kolhapur celebrates 34 new Chartered Accountants after the final exam. Asim Memon secured first rank in the Kolhapur division. The Institute of Chartered Accountants of India's Kolhapur branch provided guidance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.