CoronaVirus Kolhapur updates :जिल्ह्यात नवे ३११ रुग्ण, चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 19:34 IST2021-04-10T19:33:11+5:302021-04-10T19:34:16+5:30
CoronaVirus Kolhapur updates : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३११ नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदविण्यात आले आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,९६५ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या शनिवारीही वाढल्याने लोकांच्या छातीत पुन्हा धस्स झाले.

CoronaVirus Kolhapur updates :जिल्ह्यात नवे ३११ रुग्ण, चौघांचा मृत्यू
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३११ नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदविण्यात आले आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,९६५ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या शनिवारीही वाढल्याने लोकांच्या छातीत पुन्हा धस्स झाले.
या ३११ नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १४४ जणांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील ३१ आणि अन्य जिल्ह्यांतील १५ जणांचा समावेश आहे. आजरा तालुक्यात १५, गडहिंग्लज ३०, भुदरगड ४, कागल ३, चंदगड १, गगनबावडा १, हातकणंगले २०, करवीर २८, पन्हाळा १३, राधानगरी ३, शिरोळ ३, अशी अन्य तालुक्यांतील कोरोनाग्रस्तांची दिवसभरातील आकडेवारी आहे. दिवसभरामध्ये २२०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.