शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

३०० ‘दादा-भार्इं’हद्दपार होणार

By admin | Updated: August 17, 2014 22:51 IST

गणेशोत्सवासाठी कारवाई : गुंडांचे प्रस्ताव बनविण्याचे काम युद्धपातळीवर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गल्ली, चौकांत अथवा मंडळांच्या कट्ट्यांवर बसून ‘दादा-भार्इं’च्या जोरावर परिसरात दहशत माजविणाऱ्या सुमारे ३०० सराईत गुंडांना हद्दपार करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ज्या-त्या पोलीस ठाण्यांतर्गत हद्दपारीचे प्रस्ताव बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘दादा-भार्इं’ना आपला गाशा गुंडाळून बाहेरील जिल्ह्णात प्रस्थान करावे लागणार आहे. कोल्हापूर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन दक्ष आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्यामुळे जिल्ह्णातील वातावरण तापले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला गणेशोत्सवापासूनच सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. मंडळांना वर्गणीच्या नावाखाली मोठ्या स्वरूपात देणग्या देऊन त्यांना आपल्या बाजूने बसविण्याची व्यूहरचना इच्छुक उमेदवारांनी आखली आहे. सर्वजण साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करणार असल्याचे चित्र आहे. शहरासह उपनगरातील राजेंद्रनगर, जवाहरनगर, यादवनगर, साळोखे पार्क, लक्षतीर्थ वसाहत, वारे वसाहत, विचारेमाळ, सदर बझार, शाहूपुरी, विक्रमनगर, दौलतनगर, मंगळवार पेठ, आदी ठिकाणी गुन्हेगारी टोळक्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टी रहिवाशांचे या परिसरात मोठे बस्तान असल्याने येथील संस्कृतीच गुन्हेगारी स्वरूपाची आहे. सुपारी घेऊन दिवसाढवळ्या चौकात, भररस्त्यावर मुडदे पाडण्यासाठी ते कधीच मागे पडत नाहीत. अशा काही गुन्हेगारांचा या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.खबरदारी म्हणून पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या शहरासह उपनगरांतील सुमारे ३०० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी उपविभागीय अधिकारी, करवीर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार या सर्व गुन्हेगारांना २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्णात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. गल्लीबोळांत, चौकात आणि परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘दादा-भाई’ यांची यादी तयार करून त्यांना जिल्ह्णाबाहेर तडिपार करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत. - मनोजकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक)