शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील ३० हेक्टर जागा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:29 IST

मुंबई- कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पार्कची उभारणी ...

मुंबई-कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पार्कची उभारणी तातडीने करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.कोल्हापूर आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, वित्तचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तेथे आयटी पार्क आवश्यक आहे. तेथील तरुणांना यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे कृषी विद्यापीठाची जागा घेताना त्यांना पर्यायी जागा द्यावी. विशिष्ट कालमर्यादेत पार्क उभे न राहिल्यास जमीन कृषी विद्यापीठाला परत द्यावी. विद्यापीठाच्या या जागेपासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुणे नंतर कोल्हापूर शहर हे एक चांगला पर्याय आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीही जागा द्याकोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही पवार यांनी याबाबतच्या बैठकीत दिले. या उपकेंद्रामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. यातून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरITमाहिती तंत्रज्ञानAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफ