जिल्ह्यातील १ हजार ६६८ जागांसाठी ३ हजार ७०१ महिला रिंगणात- ग्रामपंचायत निवडणूक : ३४५ महिला बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:17+5:302021-01-10T04:17:17+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १ हजार ६६८ जागांसाठी तब्बल ३ हजार ७०१ महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या ...

3 thousand 701 women in the fray for 1 thousand 668 seats in the district - Gram Panchayat elections: 345 women unopposed | जिल्ह्यातील १ हजार ६६८ जागांसाठी ३ हजार ७०१ महिला रिंगणात- ग्रामपंचायत निवडणूक : ३४५ महिला बिनविरोध

जिल्ह्यातील १ हजार ६६८ जागांसाठी ३ हजार ७०१ महिला रिंगणात- ग्रामपंचायत निवडणूक : ३४५ महिला बिनविरोध

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १ हजार ६६८ जागांसाठी तब्बल ३ हजार ७०१ महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. माघारीच्या घडामोडीनंतर ३४५ जागांवर महिला बिनविरोध आल्या आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये महिला सदस्यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे निकालानंतरच महिला सदस्यांची अचूक आकडेवारी कळेल. मतदानाला आता सहा दिवस राहिल्याने रिंगणातील महिला विजयासाठी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात प्रचार करत आहेत.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक लढवण्यासाठी १५ हजार ४१७ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ७ हजार ४० उमेदवारांनी माघार घेतली. या माघारीनंतर ३४५ महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. सध्या ७ हजार ६५७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी ३ हजार ७०१ महिला, तर ३ हजार ९५६ पुरुष उमेदवार आहेत. मतदान १५ जानेवारीला असून, आता सहा दिवस राहिल्याने उमेदवार महिलांसह त्यांचे कुटुंबीय प्रभागात प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. हळदी-कुंकूपासून ते मेळाव्यापर्यंतच्या कार्यक्रमांतून महिला उमेदवार आपला अजेंडा मतदारांपुढे मांडत आहेत. त्यात स्थानिक आघाड्या, गटा-तटाचे राजकारण, नेत्यांचा पाठिंबा, एक-एक मतासाठी जोडणी, या घडामोडींना वेग आला आहे.

--

निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती : ३८६ (४३३ पैकी ४७ बिनविरोध)

एकूण प्रभाग संख्या : १ हजार ४९१, बिनविरोध प्रभाग १४६

एकूण सदस्य संख्या : ४ हजार २७, बिनविरोध सदस्य संख्या ७२० (३४५ महिला)

--

सर्वाधिक महिला उमेदवार असलेले तीन तालुके

कागल : ५४०

करवीर : ५१६

गडहिंग्लज : ५०५

-

तालुका : महिला उमेदवारांची संख्या : आरक्षित जागा : बिनविरोध

करवीर : ५१६ : २९१ : २६

भुदरगड : २८९ : १९५ : ५१

हातकणंगले : २९६ : १४० : १९

गडहिंग्लज : ५०५ : २२१ : ४३

पन्हाळा : १३४ : १९१ : १८

कागल : ५४० : २९० : ४४

आजरा : २१६ : १०३ : २६

शिरोळ : ४९१ : २१२ : १७

राधानगरी : १२६ : ९१ : २४

शाहूवाडी : ३३० : १६३ : ४०

चंदगड : १९२ : १७० : ३६

गगनबावडा : ६६ : ३१ : ५

--

Web Title: 3 thousand 701 women in the fray for 1 thousand 668 seats in the district - Gram Panchayat elections: 345 women unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.