शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

‘इंडिया पेमेंट’चे अडीच महिन्यांत २७७२ खातेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:07 IST

गणेश शिंदे । कोल्हापूर : बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या बॅँकिंग सुविधा पोहोचविणे ...

ठळक मुद्देगोवा परिक्षेत्रात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर ग्रामीण भागातील लोकांना अतिशय फायदेशीर

गणेश शिंदे ।कोल्हापूर : बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या बॅँकिंग सुविधा पोहोचविणे हा उद्देश व ‘आपली बँक आपल्या दारी’ हे ब्रीद घेऊन भारतीय डाक विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चे (आयपीपीबी) गेल्या अडीच महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्णात २७७२ खातेदार झाला आहेत.

गोवा परिक्षेत्रात कोल्हापूर शाखेचा ‘आयपीपीबी’मध्ये दुसरा क्रमांक लागतो. सध्या जिल्ह्यात पाच ठिकाणी ही सेवाकेंद्रे सुरू आहेत. जिल्ह्णात एकूण ५६३ सेवाकेंद्रे होणार आहेत. त्यांतील उर्वरित ५५१ सेवाकेंद्रे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. याचा लाभ विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे.

देशातील तीन लाखांपेक्षा अधिक पोस्टमन ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागांत अगदी दारावर जाऊन ‘आयपीपीबी’ ही सुविधा पोहोचविण्यास मदत करणार आहेत. एक सप्टेंबर २०१८ रोजी ‘आयपीपीबी’ची ६५० शाखा व ३२५० सेवाकेंद्रे सुरू झाली. देशभरात एक लाख ५५ हजार सेवाकेंद्रे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्णात डाकघराच्या (पोस्ट) ६५० शाखा आहेत. गॅस अनुदान, विद्यार्थी शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री मातृत्व योजना, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना, मनरेगा, धान्य वितरण पुरवठा, आदी सरकारच्या सेवांना आयपीपीबी सुविधा उपयोगी पडणार आहे. या सुविधेचा लाभ मिळावा म्हणून शाखेने वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्यकेंद्रांत जाऊन मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत खाती उघडली आहेत. एक सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात २७७२ खातेदार झाले आहेत. विशेषत: डाकघरामधील बचत खाते आपल्या आयपीपीबी खात्याशी जोडून या सुविधेचा लाभ (पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी) ग्राहक घेऊ शकतो.

याचबरोबर एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूपीआय, एईपीएस या ठिकाणी पैसे हस्तांतरण करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला कोणत्याही कागदपत्रांच्या झेरॉक्सची गरज भासणार नाही.असे मिळतात पैसेकोणत्याही खातेदाराला एस. एम. एस. बँकिंग, मिस्ड कॉल आणि टोल १५५२९९ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा लागतो. त्यानंतर पोस्टमन संबंधित खातेदाराला घरपोच पैसे देतो. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.गोवा परिक्षेत्र (१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ अखेर)जिल्हा खातेदारगोवा (पणजी ३०६२ व मडगांव १७२१) ४७८३कोल्हापूर २७७२सांगली २०८०रत्नागिरी १३९५सिंधुदुर्ग (मालवण) ७४४एकूण ११७७४वैशिष्ट्येग्राहकांना घरामधून बाहेर निघण्याचीसुद्धा आवश्यकता राहणार नाही.वेळ वाचणार.या ठिकाणी सध्या सेवारमणमळा मुख्य डाकघरमार्केट यार्डपंचगंगा रुग्णालयाजवळील शुक्रवार पेठहेर्ले (ता. हातकणंगले)उचगाव (ता. करवीर) 

आयपीपीबी ही घरपोच बँकिंग सुविधा ग्रामीण भागातील लोकांना फायदेशीर ठरणार आहे. आता लवकरच शहरात पाच, तर गडहिंग्लज येथे दोन अशा एकूण सात ठिकाणी सेवाकेंद्रे सुरू करणार आहे. - अमोल कांबळे, वरिष्ठ प्रबंधक, आयपीपीबी, कोल्हापूर शाखा.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसा