शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २६ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 19:04 IST

gram panchayat Election kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून २६ अर्ज महसूल विभागाकडे आले. सर्वाधिक १० अर्ज हातकणंगले तालुक्यांतून आले आहेत. शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने सोमवार, मंगळवार व बुधवार हे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पहिल्याच दिवशी २६ अर्ज दाखलग्रामपंचायतीची रणधुमाळी : अर्जासह कागदपत्रांच्या चौकशीसाठी गर्दी

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून २६ अर्ज महसूल विभागाकडे आले. सर्वाधिक १० अर्ज हातकणंगले तालुक्यांतून आले आहेत. शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने सोमवार, मंगळवार व बुधवार हे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारले जात असून पहिल्या दिवशी २६ अर्ज आले. अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी तहसीलदार कार्यालय, तसेच अर्ज भरण्याच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची व समर्थकांची गर्दी झाली होती.

अनेकांची कागदपत्रांची अद्याप पूर्तता न झाल्याने व काही प्रभागांमध्ये उमेदवारीचे त्रांगडे असल्यानेही पहिल्या दिवशी अर्ज सादर करता आले नाहीत. आज मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ख्रिसमस, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने सोमवारपासून पुढे तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.आलेले उमेदवारी अर्जतालुका    ग्रामपंचायतींची संख्या   आलेले अर्जशाहूवाडी : ४१ : ०पन्हाळा : ४२ : ३हातकणंगले : २१ : १०शिरोळ : ३३ : १करवीर ५४ : १गगनबावडा : ८ : ०राधानगरी : १९ : ०कागल : ५३ : १भुदरगड : ४५ : २आजरा : २६ : ४गडहिंग्लज : ५० : ४चंदगड : ४१ : ०एकूण ४३३ : २६

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर