रस्त्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३ वर्षांत २५ हजार वृक्षांची कत्तल

By संदीप आडनाईक | Updated: June 3, 2025 15:32 IST2025-06-03T15:31:37+5:302025-06-03T15:32:22+5:30

लागवड केवळ हजारात

25000 trees cut down in 3 years in Kolhapur district for roads | रस्त्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३ वर्षांत २५ हजार वृक्षांची कत्तल

संग्रहित छाया

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२२-२३ आणि २०२४-२५ या तीन वर्षांत रस्ते विकास कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शंभर वर्षांहून अधिक वयाची सुमारे २५ हजार ४३४ झाडे तोडलेली आहेत. बहुतांशी ठिकाणी कंत्राटदारांनी स्थानिक देशी झाडे तोडून त्याबदल्यात केवळ हजाराच्या आसपास तीही विदेशी झाडे लावली आहेत तर काही ठिकाणी झाडेच लावली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते कामासाठी झालेल्या वृक्षतोड आणि त्याबदल्यात पुन्हा न केलेली वृक्षलागवड या संवेदनशीलप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी, वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अभिजित वाघमोडे यांनी गेल्या काही वर्षांपासून अविरत पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्ता वृक्षतोडप्रकरणी २८ मे रोजी कोल्हापूर वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस काढली. यामुळे हे हिमनगाचे एक टोक असल्याचे निदर्शनास आले आहे.

तोडलेली वृक्षांची संख्या

वर्ष - रस्त्याचे नाव - वनक्षेत्र - एकूण
२०२२-२३ - कागल रोड  - करवीर - ७२
२०२२-२३ - केर्ले ते रत्नागिरी (रा. म. क्र. १६६) - करवीर - १
२०२२-२३  - फुलेवाडी ते गगनबावडा  - करवीर - ९२८
२०२२-२३ - फुलेवाडी ते कळे (रा. म. क्र. १६६) - पन्हाळा - ३१२
२०२२-२३ - रत्नागिरी ते कोल्हापूर (रा. म. क्र. १६६) - पन्हाळा - १६३५
२०२२-२३ - रत्नागिरी ते कोल्हापूर (रा. म. क्र. १६६) - मलकापूर - ५०७
२०२२-२३ - केर्ली कोतोली नांदगाव (रा. म. क्र. २०४) - करवीर - ७२
२०२२-२३ - केर्ली कोतोली नांदगाव (रा. म. क्र. २०४) - पन्हाळा - १२२६
२०२२-२३ - बाजारभोगाव ते अनुस्कुरा  - पेंडाखळे - १७
२०२२-२३ - आंबोली ते संकेश्वर (रा. मा. क्र. ५४८) - आजरा - १६७९
२०२२-२३ - सुळ्ये ते हेरे (रा. मा. क्र. १८९)  - चंदगड - ७२
२०२३-२४ - मुदाळ तिट्ठा ते यमगे - करवीर - २०
२०२३-२४ - नांदगाव ते नांदारी (रा. मा. २०४)  - पेंडाखळे - १५०
२०२३-२४ - वारणा ते शिरोली घुणकी  - करवीर - ४३७९
२०२३-२४ - हातकणंगले ते चोकाक - करवीर - २५३३
२०२३-२४ - पडवळवाडी ते शिये  -  करवीर - ७२१६
२०२३-२४ - करवीर ते कागल - करवीर - ३८३०
२०२३-२४ - रत्नागिरी ते कोल्हापूर (महामार्ग) - पन्हाळा - १५०
२०२४-२५ - सांगशी ते खोकुर्ले (राज्य मार्ग क्र.१६६) - गगनबावडा - ४९८
२०२४-२५ परखंदळे-कळे-गगनबावडा - पन्हाळा - १३७

Web Title: 25000 trees cut down in 3 years in Kolhapur district for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.