कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील २३ लाख ४० हजार १९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ११ लाख ८७ हजार २०३ पुरुष तर ११ लाख ५२ हजार ९०९ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ८ हजार १७४ मतदार हे करवीर तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी मतदार गगनबावड्यात आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल मंगळवारी वाजल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगरपालिका, महापालिका निवडणुकीला महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त हाेती. जिल्हा परिषदेला मात्र पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा ३४ हजार २९४ ने जास्त आहे.
वाचा : तब्बल पावणेनऊ वर्षांनी गावागावांत ‘झेडपी’चा धुरळा; इच्छुक लागले कामाला
मतदान केंद्र २ हजार ६९१जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ हजार ६९१ मतदान केंद्र निश्चित जाली असून त्यासाठी ६८ निवडणूक विभाग कार्यरत असतील. गण संख्या एकूण १३६ आहे.
तालुका : मतदान केंद्र : पुरुष : स्त्री : इतर : एकूण मतदारकरवीर : ४१७ : २०८५८० : १९९५५९ : ३५ : ४०८१७४हातकणंगले : ३५५ : १८०६३५ : १७५०४७ : २० : ३५५७०२शिरोळ : २३२ : ११९२७२ : १२०८२८ : २ : २४०१०२पन्हाळा : २५४ : ११२३५८ : १०५९७६ : ७ : २१८३४१कागल : २३१ : १०१२५५ : ९९४३७ : २ : २००६९४राधानगरी : २२३ : ९०८६० : ८३४९२ : ७ : १७४३५९गडहिंग्लज : २०६ : ८४७४९ : ८६७९१ : ९ : १७१५४९शाहुवाडी : २०९ : ८१८९६ : ७७२२७ : ० : १५९१२३चंदगड : २११ : ७७३५७ : ७५७९१ : ० : १५३१४८भुदरगड : १८० : ६८०५२ : ६५४१७ : ५ : १३३४७४आजरा : १२७ : ४७०१५ : ४९५९६ : ० : ९६६११गगनबावडा : ४६ : १५१७४ : १३७४८ : ० : २८९२२एकूण : २ हजार ६९१ : ११ लाख ८७ हजार २०३ : ११ लाख ५२ हजार ९०९ : ८७ : २३ लाख ४० हजार १९९
Web Summary : Kolhapur Zilla Parishad election sees 2.3 million voters. Karvir taluka has the highest number with 4.08 lakh voters, while Gaganbawda has the fewest. There are slightly more male voters than female voters.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में 23 लाख मतदाता हैं। करवीर तालुका में 4.08 लाख मतदाताओं के साथ सबसे अधिक हैं, जबकि गगनबावड़ा में सबसे कम हैं। महिला मतदाताओं की तुलना में पुरुष मतदाता थोड़े अधिक हैं।