शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
3
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
4
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
5
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
6
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
7
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
8
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
9
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
10
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
11
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
12
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
13
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
14
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसकडे २२०, भाजपकडे २९२ जणांचे उमेदवारी अर्ज; पक्षीय पातळीवर झाली तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:45 IST

काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायचीय, भाजपने केला निर्धार

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे रणांगण हळूहळू तापत चालले असून, काँग्रेसकडून मैदानात उतरण्यासाठी आतापर्यंत २२० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भारतीय जनता पक्षाकडे २९२ जणांनी उमेदवारी मागितली आहे. अन्य पक्षांनीही उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत.निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून लढण्यास कोण कोण इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस आणि भाजपने अर्ज मागविले आहेत. तर शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी इच्छुकांची यादी तयार केली आहे. उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाकडे २९२ जणांनी उमेदवारी मागितली असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. २ डिसेंबरपासून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज वितरित करण्यात येत आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील २२० इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. येत्या ८ डिसेंबरपर्यंत काँग्रेस कमिटी येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर १३ डिसेंबरपासून काँग्रेस कमिटी येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यातून २० प्रभागांतील उमेदवार निवडले जातील.दरम्यान, ज्यांना उमेदवारी अर्ज फॉर्म घ्यायचे आहेत, त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायचीय२०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यानंतर सभागृहाची मुदत संपल्यानंतर कोरोनाचे संकट आले. परिणामी, निवडणुका पुढे गेल्या. पुढच्या काळात ओबीसी आरक्षणावरून निवडणुका लांबल्या. आता निवडणुका जाहीर होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जाेरदार तयारी सुरू केली आहे.भाजपने केला निर्धारभाजपने २०१५ मध्ये ताराराणी आघाडीसोबत युती करून ३३ जागा जिंकल्या होत्या. त्यांना सत्ता स्थापन करण्यास अवघ्या आठ जागा कमी पडल्या होत्या. आता तर भाजपसोबत ताराराणी आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आहेत. त्यांना शिंदेसेनेचीही ताकद मिळणार आहे. त्यामुळे भाजपने यावेळी पालिकेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: Congress, BJP Gear Up with Candidate Applications

Web Summary : Kolhapur's municipal election heats up. Congress received 220 applications, BJP 292. Other parties are also preparing candidate lists, aiming to win the upcoming elections. BJP, with allies, is determined to hoist its flag this time.