कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर उमेदवारांनी केलेल्या मागणीनुसार कोल्हापूर उत्तर व चंदगड या दोन मतदारसंघांतील ईव्हीएम मशीनची २१ व २२ तारखेला डमी पडताळणी व तपासणी होणार आहे.निवडणूक विभागाने हा कार्यक्रम जाहीर केला असून, राजाराम तलाव येथे सकाळी १० ते रात्री ११:५५ वाजेपर्यंत पाच अभियंत्यांच्या टीमकडून ही कार्यवाही केली जाईल. अन्य तीन मतदारसंघांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयात असल्याने त्यांची पडताळणी होणार नाही. ही फक्त पडताळणी होणार आहे. मतमोजणी नव्हे. त्यामुळे यातून काही हाती लागण्याची शक्यता नाही.विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड, हातकणंगले या पाच मतदारसंघांमधील उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र, फेरमतमोजणीची मागणी निकालानंतरच्या अर्धा एक तासातच केली जाते. ही वेळ उलटून गेल्याने आता ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी व तपासणी केली जाणार आहे.
एका मतदारसंघातील विविध केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये १४०० मतं टाकली जातील. ही मते व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांची तपासणी व पडताळणी केली जाईल. त्यातही उमेदवारांना तीन दिवस आधी माघार घेता येऊ शकते.कोल्हापूर दक्षिण, करवीर व हातकणंगले येथील निकालाबाबत उच्च न्यायालयात याचिका सुरू असल्याने पडताळणी करता येणार नाही.
चंदगड मतदारसंघ२१ फेब्रुवारी : केंद्र क्रमांक : कोवाडे (३), निंगुरगे (५), महागाव (१२५), खंदाळ (१००)२२ फेब्रुवारी : चंदगड (२३८)
कोल्हापूर उत्तर२१ फेब्रुवारी : केंद्र क्रमांक : शुगरमिल (३), गुजरातील विद्यामंदिर (१२०), शिवाजी मराठा मंदिर (२१३)२२ फेब्रुवारी : शाहू दयानंद विद्यालय (२८४), तवनाप्पा पाटणे हायस्कूल (३०५)