शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खिद्रापूर मंदिराच्या संवर्धनासाठी २१ कोटी, लवकरच काम सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:30 IST

आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

शिरोळ : बाराव्या शतकातील शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेल्या हेमाडपंथी श्री कोपेश्वर मंदिर जतन, संवर्धन व परिसराचा विकास करण्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून २१ कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाल्याने श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर परिसराचा विकास होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटमध्ये या कामाचा समावेश केला होता. या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासंदर्भात किमया कॉन्सर्वेशन व आर्किटेक या फर्मची नेमणूक केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मंदिराचा अहवाल सादर केला. अतिवृष्टी व सातत्याने आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराला तडे गेले होते व झीज झाली होती. त्या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसराचे सुशोभीकरण या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अधिन असल्याने या मंदिरच्या जतन व संवर्धनाच्या प्रस्तावाला केंद्रीय पुरातत्व विभागाने मान्यता दिली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन, दगडी फरस बंदी तसेच परिसराचा विकास करण्यासाठी २१ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून प्रत्यक्षात लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सहकार्य लाभले. प्राचीन शिल्पकलेचा नमुना असलेल्या हेमाडपंथी कोपेश्वर मंदिराला अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे तडे जाऊन व झीज होऊन मंदिराला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या मंदिराचे जतन व संवर्धन करणे गरजेचे होते. त्यानुसार या मंदिराला निधी प्राप्त झाला असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. या निधीमुळे भाविकांसह पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधीTempleमंदिर