जि.प.तील २०० जण अन्टीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:18 IST2021-04-23T19:16:35+5:302021-04-23T19:18:50+5:30
CoronaVirus KolhapurZp- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी अन्टीजेन चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जि.प.तील २०० जण अन्टीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह
कोल्हापूर -जिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी अन्टीजेन चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी अशा प्रकारची टेस्ट घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना गुरूवारी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. साळे यांनी नियोजन केले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील ग्रंथालयात ही चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
त्यानुसार सुरूवातीला अजयकुमार माने, डॉ. योगेश साळे, डॉ. फारूक देसाई यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी अशा २०० जणांची चाचणी करण्यात आली. चाचणीचे कीटस् संपल्यामुळे काही जणांची चाचणी करण्यात आली नाही. सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, त्यांच्याकडील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश विलासराव नलवडे ,अमित तुकाराम नलवडे, स्मिता मारुती शिंदे , उत्तम महिपती कलिकते , संतोष श्रीपती गुरव यांच्या वैद्यकीय पथकामार्फत या चाचण्या करण्यात आल्या. उर्वरित कर्मचा-यांची अँटीजेन चाचणी सोमवारी करण्यात येणार आहे.