गडहिंग्लज नगरपालिकेला 'एकता'कडून १८ हजारांचे सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:20 AM2021-05-03T04:20:06+5:302021-05-03T04:20:06+5:30

कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी शहरातील नारापगोळ गल्लीतील एकता गणेशोत्सव तरुण मंडळातर्फे लाकडे भेट देण्यात आली. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यासह परिसरातील ...

18,000 to Gadhinglaj Municipality from 'Ekta' | गडहिंग्लज नगरपालिकेला 'एकता'कडून १८ हजारांचे सरण

गडहिंग्लज नगरपालिकेला 'एकता'कडून १८ हजारांचे सरण

Next

कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी शहरातील नारापगोळ गल्लीतील एकता गणेशोत्सव तरुण मंडळातर्फे लाकडे भेट देण्यात आली.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यासह परिसरातील कोरोनाबाधित मृतांवर गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सरणाची कमतरता पडत आहे. त्यासाठी मदतीचे आवाहन उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी केले होते. त्यानुसार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून ही मदत दिली.

यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, मंडळाचे अध्यक्ष बाळू दळवी, अमोल हातरोटे, सुरेश तेलवेकर, संतोष हातरोटे, सतीश येसरे, सचिन बांदेकर, अजय रावण, प्रशांत शेंडे, आदित्य देवेकर, राजू शिंदे, कल्लेश सोलापुरे, अनिल साळोखे व मयूर केसरकर आदी उपस्थित होते.

--------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज नगरपालिकेला एकता गणेशोत्सव मंडळातर्फे सरणासाठी लाकडे देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेरकर, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : ०२०५२०२१-गड-१५

Web Title: 18,000 to Gadhinglaj Municipality from 'Ekta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.