शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना अटक

By admin | Updated: June 5, 2016 01:07 IST

अंबाबाई मंदिर प्रवेश प्रकरण : पोलिस निरीक्षक देशमुखांना निलंबित करण्याची मागणी

कोल्हापूर : अंबाबाई देवी मंदिरात गाभाऱ्यातील मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी व या घटनेवेळी बेजबाबदारपणा करणाऱ्या कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित करावे, या मागणीसाठी पोलिस ठाण्याजवळ ठिय्या आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच चार पुरुषांचाही समावेश आहे. अंबाबाई देवी मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून देसाई यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १३ एप्रिल २०१६ ला मंदिरात आंदोलन केले होते. त्यावेळी देसाई यांना गाभाऱ्यात मारहाण झाली होती. या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. यातील उर्वरित आरोपींना अटक करावी, अशी मागणी देसाई यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे केली होती; पण, देशमुख यांनी उर्वरित आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली असल्याने तृप्ती देसाई यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, शनिवारी देसाई यांच्यासह महिलांनी पोलिस ठाण्याजवळ सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ठिय्या मारला. आंदोलकांनी मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करा व देशमुख यांना निलंबित करा, अशा जोरदार घोषणा दिल्या. मागण्यांची दखल घेत नाही, तोपर्यंत येथून न हलण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी देसाई यांच्यासह अन्य महिलांना पोलिसांनी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यानंतर लगेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण उनाळे यांच्या न्यायालयात हजर केले. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे : तृप्ती प्रशांत देसाई ( रा. धनकवडी, पुणे), मनीषा राहुल टिळेकर, कांतिलाल सीताराम गवारे, शहनाज निसार शेख (तिघी राहणार भवानी पेठ, पुणे), बिस्मिला शब्बीर कागदे, मदिना जहॉँगीर सनदी, वहिदा रफिक सनदी, सबीना इस्माईल सनदी, फरजाना रशीद सनदी (सर्व रा. घुणकी, ता. हातकणंगले.), आनंदी प्रकाश पाटील, मंगल बबन ओंकार, अमीर गुलाब मुल्ला, झाकीर अल्ताफ शेख, शाहरूख अकबर सनदी (तिघे रा. वडणगे, ता. करवीर), माधुरी सुरेश शिंदे (रा. उदगाव, ता. शिरोळ.), आशा सुरेश गाडीवडर (रा. जयसिंगपूर, ता. हातकणंगले)