प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्यात १८ जणांचा आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:25 IST2025-01-25T15:24:43+5:302025-01-25T15:25:12+5:30

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १८ जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान संबंधितांनी आत्मदहन करू नये यासाठी शुक्रवारी ...

18 people in Kolhapur district threaten to commit self immolation on Republic Day | प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्यात १८ जणांचा आत्मदहनाचा इशारा

संग्रहित छाया

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १८ जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान संबंधितांनी आत्मदहन करू नये यासाठी शुक्रवारी दिवसभर त्यांच्या तक्रारीवर काम सुरू होते. त्यातून काही जणांनी निर्णय मागे घेतल्याचे सांगण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी संबंधित पाच प्रकरणे आहेत.

जमीन, महसूल, रस्ता सोडणे यासह अनेक प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून लवकर न्याय मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयांसमोर जिल्ह्यातील १८ जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत दखल घेत प्रत्येक विभागाला ही माहिती कळवली असून संबंधितांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना आत्मदहनापासून परावृत्त करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

Web Title: 18 people in Kolhapur district threaten to commit self immolation on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.