किसान मुक्ती यात्रेसाठी उगारेंची दिल्लीत धडक, दुचाकीवरून केला १७७७ किलो मीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 04:14 PM2017-11-18T16:14:34+5:302017-11-18T16:22:49+5:30

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २०) दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ५४ वर्षीय सुकुमार आण्णा उगारे हे दुचाकीवरून दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल १७७७ किलो मीटरचा प्रवास करून आलेल्या उगारे यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयकुमार कोले यांनी केले. उगारे १४ नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरातून निघाले होते.

1777 kilometer mileage was carried out in the capital of Delhi for the release of farmers' Mukti Yatra | किसान मुक्ती यात्रेसाठी उगारेंची दिल्लीत धडक, दुचाकीवरून केला १७७७ किलो मीटरचा प्रवास

दिल्लीत सोमवारी होणाऱ्या मोर्चासाठी स्वाभिमानी’चे सुकुमार उगारे दुचाकीवरून शनिवारी दिल्लीत पोहोचले. यावेळी जयकुमार कोले यांनी त्यांचे स्वागत केले.

Next
ठळक मुद्दे५४ वर्षीय सुकुमार आण्णा उगारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरातून १४ नोव्हेंबरला सुरु केला प्रवास १७७७ किलो मीटरचे अंतर दुचाकीवरून पार

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २०) दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ५४ वर्षीय सुकुमार आण्णा उगारे हे दुचाकीवरून दिल्लीत पोहोचले आहेत.

तब्बल १७७७ किलो मीटरचा प्रवास करून आलेल्या उगारे यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयकुमार कोले यांनी केले. उगारे १४ नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरातून निघाले होते.

अहमदनगर, धुळे, मंदसौर-मध्य प्रदेश, चितोरगड, भिलवारा, किशनगड, जयपूर, गुडगाव ते दिल्ली असे १७७७ किलो मीटरचे अंतर दुचाकीवरून पार करीत ते शनिवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. त्यांचे स्वागत कोले यांनी केले.
 

 

Web Title: 1777 kilometer mileage was carried out in the capital of Delhi for the release of farmers' Mukti Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.