अमरच्या उपचारासाठी रवळनाथकडून १५ हजाराची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 15:06 IST2021-05-04T15:05:20+5:302021-05-04T15:06:01+5:30
Gadhingalj Kolhapur : श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे येथील कॅन्सरग्रस्त तरूण अमर नाईक याच्या उपचारासाठी १५ हजाराची मदत देण्यात आली.

गडहिंग्लज येथे रवळनाथतर्फे एम. एल. चौगुले यांनी अमरची आत्या मालूताई नाईक यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी वासुदेव मायदेव, मीना रिंगणे, दत्तात्रय मायदेव, विजय आरबोळे आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे येथील कॅन्सरग्रस्त तरूण अमर नाईक याच्या उपचारासाठी १५ हजाराची मदत देण्यात आली.
अमर हा गडहिंग्लज नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. दोन वर्षापूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. त्यापाठोपाठ त्याच्या वडीलांचेही अकस्मिक निधन झाले. त्याची आई व आत्या दोघी धुणी-भांडी करून घर खर्च चालवितात. दरम्यान, अमरला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे १० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, ही रक्कम त्याच्या कुटुंबांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दानशूर व्यक्ती आणि संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार ही मदत करण्यात आली.
रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते ह्यअमरह्णच्या आत्या मालूताई नाईक यांच्याकडे रूपये १५ हजाराची रोख मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव, संचालक प्रा. विजय आरबोळे, संचालिका प्राचार्या मीना रिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, विशाल रोटे आदी उपस्थित होते.