केदारलिंग सूतगिरणीस १३ कोटी भागभांडवल : कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:04+5:302021-04-05T04:22:04+5:30
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातील श्री केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी असून शासकीय पंचेचाळीस टक्के, शेतकरी, सभासद पाच टक्के ...

केदारलिंग सूतगिरणीस १३ कोटी भागभांडवल : कोरे
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातील श्री केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी असून शासकीय पंचेचाळीस टक्के, शेतकरी, सभासद पाच टक्के व कोणत्याही बँकेकडून पन्नास टक्के कर्जातून केदारलिंग सूतगिरणीची उभारणी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने २७.५० कोटी शासकीय भागभांडवल मंजूर केले होते. त्यापैकी१४ कोटी यापूर्वी मिळाले होते, उर्वरित १३.५० आता मिळाले. शेतकरी सभासदांच्या भागभांडवलातून आणि कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सूतगिरणीचे काम सुरू केले होते. उर्वरित शासकीय भागभांडवल न मिळाल्याने काम थांबविले होते. आता शासकीय साडेतेरा कोटी उपलब्ध झाल्याने संस्थेचे कामकाज पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील आदर्शवत सूतगिरणी होईल, असा विश्वासही डॉ. विनय कोरे व उपाध्यक्ष विजयसिंह जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकारी संचालक, संचालक उपस्थित होते.