शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

By उद्धव गोडसे | Updated: May 27, 2025 19:29 IST

बेफिकिरी जिवावर बेतते

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. मागील १२० दिवसांत (चार महिने) कागल ते पेठ नाक्यादरम्यान १२३ अपघात झाले. यात ३७ जणांनी जीव गमावला, तर ३९ जण गंभीर जखमी झाले. टोप ते अंबप फाट्यादरम्यान तीन दिवसांत दोन मोठे अपघात झाले. पावसाळ्यात अपघातांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.संपूर्ण देश दक्षिणोत्तर जोडणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच याच्या रूंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, रखडलेली कामे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान १०३ अपघातांची नोंद झाली होती.यंदा पहिल्या ४ महिन्यांत १२३ अपघात झाले. यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३९ जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, पावसाळ्याच्या तोंडावर हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रखडलेल्या कामांमुळे धोका वाढलामहामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान उड्डाणपूल आणि मोऱ्यांचे काम अजून सुरूच आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही रखडले आहे. सर्व्हिस रोड उपलब्ध नाहीत. सूचना फलक लावले जात नाहीत. महामार्गावर स्थानिक वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पोलिसांनी दिल्या सूचनापावसाळ्यात अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला खबरदारीच्या उपाययोजनांचे पत्र पाठवले आहे. त्यात सखल भागात पाणी साचू नये, काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, धोकादायक झाडे हटवावीत, पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवावी, सूचना फलक लावावेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

बेफिकिरी जिवावर बेततेअपघात होण्यास महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम कारणीभूत आहेच, पण वाहनचालकांची बेफिकिरीही तितकीच कारणीभूत ठरते. बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. कार आणि मालवाहतूक करणारी वाहने लेनमधून बाहेर पडताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. यामुळे अपघात वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जानेवारी ते एप्रिल २०२५ मधील अपघात (कागल ते पेठ नाका)

  • एकूण अपघात : १२३
  • प्राणांतिक अपघात : ३७
  • गंभीर अपघात : ३९
  • किरकोळ अपघात : १४
  • बिगर दुखापत : ३३

पुणे-बंगळुरू महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाला पाठवले आहे. लवकरच यातील कामांना सुरुवात होईल. - सत्यराज घुले, पोलिस निरीक्षक, महामार्ग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातhighwayमहामार्ग