फिरंगाई तालमीच्या १२१ जणांचा... प्रेरणादायी उपक्रम : २४२ अंधांना मिळेल दृष्टी
By Admin | Updated: January 29, 2015 00:17 IST2015-01-28T23:58:57+5:302015-01-29T00:17:10+5:30
मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

फिरंगाई तालमीच्या १२१ जणांचा... प्रेरणादायी उपक्रम : २४२ अंधांना मिळेल दृष्टी
कोल्हापूर : शतकमहोत्सवी वर्ष साजरा करत असलेल्या शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाच्या १२१ कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. तालमीच्या कार्यकर्त्यांनी शतकमहोत्सवी वर्षानिमित्त केलेला हा संकल्प म्हणजे २४२ अंधांच्या जीवनात प्रकाश देणारा असा आहे, असे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी येथे बोलताना काढले. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
एखाद्या मंडळाचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने नेत्रदानाचा संकल्प करतात हा राज्यातील सार्वजनिक मंडळांना प्रेरणा देणारा असून आपल्या आयुष्यात असे दानशूर कार्यकर्ते मी यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. या कार्यकर्त्यांना अंधबांधवांचा दुवा मिळेल, असेही खासदार महाडिक म्हणाले. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भरून दिलेली संकल्पपत्रे नेत्रपेढीकडे देण्यात आली.
यावेळी तालमीचे अध्यक्ष नगरसेवक रवीकिरण इंगवले, भाजपचे नेते रामभाऊ चव्हाण, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव,माजी नगरसेवक सुहास लटोरे, दत्तम इंगवले, जयेश कदम, सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, माजी नगरसेवक अजित राऊत आदी उपस्थित होते.