शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

Kolhapur: एएस ट्रेडर्सच्या संचालकांची १२ कोटींची मालमत्ता जप्त, लोकांच्या पैशावर परदेशात ऐश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 12:22 IST

फसवणूक किती कोटींची? अटकेतील लोहितसिंगच्या तपासातून नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता

कोल्हापूर : एएस ट्रेडर्स कंपनीचा भूलभुलैया दाखवून लोहितसिंग सुभेदार आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. त्याच पैशांवर त्यांनी देश-विदेशात मौजमजा केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली.

पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत एएसचे संचालक आणि एजंटकडून १२ कोटींची मालमत्ता जप्त केली. कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याचा रुबाब उतरला असून, दीड वर्षांपूर्वी बाउन्सरसोबत ग्रँड एन्ट्री करणारा लोहितसिंग आता हातात बेड्या आणि पोलिसांच्या गराड्यात अडकला आहे.१२ कोटींची मालमत्ता निष्पन्नआर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास जाताच तत्कालीन तपास अधिकारी निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संशयित अमित शिंदे, विजय पाटील, संतोष मंडलिक, प्रवीण पाटील, चांदसो काझी आणि नामदेव पाटील यांच्याकडून चार कार आणि तीन दुचाकी जप्त केल्या होत्या. सध्याच्या तपास अधिकारी निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी बाबासो धनगर आणि बाबू हजारे यांनी मुंबईत खरेदी केलेले सहा फ्लॅट, वंदूर (ता. कागल) येथील पाच एकर जमीन, उजळाईवाडी, मुडशिंगी, केआयटी कॉलेज येथील तीन प्लॉटचा शोध घेऊन दोन दुचाकी जप्त केल्या. अमित शिंदे याचे कदमवाडी येथील पेंटहाउस, एक फ्लॅट, पाडळी येथील १२ गुंठे जागा, पळसंबे (ता. गगनबावडा) येथील आठ एकर जमिनीचा शोध घेऊन कागदपत्रे जप्त केली. बाबासो धनगर याची एक कार आणि एक दुचाकी जप्त केली. श्रुतिका सावेकर हिचे सहा लाख रुपयांचे दागिने, तसेच लोहितसिंगच्या पत्नीचे २८ लाखांचे दागिने जप्त केले. एएस ट्रेडर्स आणि तिच्या उपकंपन्यांच्या बँक खात्यांवरील तीन कोटी ९६ लाखांची रक्कम गोठवण्यात आली, अशी १२ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आईच्या नावाने कंपनीलोहितसिंग याच्या आईचे नाव अलका सुभेदार असे आहे. आईच्या नावाची अद्याक्षरे घेऊन त्याने ए.एस. ट्रेडर्स असे कंपनीचे नामकरण केले. त्याचे वडील बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते दोघेही पलूस (जि. सांगली) येथे राहतात, तर त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला असून, ती मुलीसह पुण्यात राहते.

फसवणूक १५०० कोटींची?एएस ट्रेडर्सने एकूण तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती तत्कालीन तपास अधिकारी औदुंबर पाटील यांनी दिली होती. मात्र, फसवणुकीची व्याप्ती १५०० कोटींपर्यंतच असू शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. अटकेतील लोहितसिंगच्या तपासातून नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस