शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
4
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
5
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
6
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
7
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
8
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
9
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
10
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
11
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
12
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
13
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
14
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
15
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
16
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
17
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
18
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती
19
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
20
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

ठिबक सिंचनचे १० कोटी अनुदान प्रलंबित, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:46 IST

२५३ शेतकऱ्यांना 'इतक्या' लाखांचे अनुदान वाटप केले

सतीश पाटीलशिरोली : शेती आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ठिबक व तुषार सिंचनसाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान दिले जाते. अनुदानाच्या आशेने कोल्हापूर जिल्ह्यातील २५१९ शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून उसनवारी करून महागड्या कंपन्यांचे ठिबक सिंचन बसवले आहेत. यातील २२६६ शेतकऱ्यांचे जवळपास १० कोटी ५२ लाखांचे अनुदान एक वर्षापासून शासन दरबारी लटकले आहे, तर २५३ शेतकऱ्यांना ६८.४८ लाखांचे अनुदान वाटप केले आहे. अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकरी कृषी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०२३-२४ मध्ये २५१९ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी अर्ज दाखल केले होते. उन्हाच्या झळा सुरू झाल्या की, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शासन फार गंभीर होते. उपसाबंदी करून पाणी वाचविले जाते. पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी शासनाकडून ठिबकचा आग्रह धरला जातो. जमिनीचे झालेले विभाजन व शासनाच्या ठिबकच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांचे कमीत कमी २० गुंठे क्षेत्र असणे ही अट अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून लांब ठेवत आहे. इच्छा असूनही या अटीमुळे अनेक शेतकरी या योजनेत बसत नाहीत. सर्व अटी व नियम पाळून एखादा शेतकरी या योजनेत बसला तर त्याला शासकीय अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करावी लागतात.ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्मची हार्डकॉपी नोंदीसह सातबारा व आठ अ उतारा, सरकारी व राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते पासबुक, मान्यताप्राप्त वितरकाचे कोटेशन व बिल, माती परीक्षण अहवाल, ठिबक संचासह शेतकऱ्याचे दोन फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स जोडल्यानंतर ती कागदपत्रे कृषी कार्यालयात सादर करावी लागतात.

अनुदानासाठी शेतकऱ्यांना अगोदर आपल्या खिशातील पैसे घालून ठिबक बसवावे लागते. शासकीय अनुदान मिळणार म्हणून शेतकरी लाखो रुपयांचे कर्ज काढून उसनवारी करून महागड्या कंपन्यांचे ठिबक सिंचन बसवतात. मात्र, शासनाचे हे अनुदान जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसतो.

जिल्ह्यातील २२६६ लाभार्थी शेतकऱ्यांचे १० कोटी ५२ लाखांचे ठिबक सिंचनाचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अनुदान आल्यावर लवकरच वाटप होईल. -अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfundsनिधी