शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘शालेय पोषण आहार’चे दीड कोटी रुपये पडून; पैसे मिळाले नाहीत तर.., भगवान पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:09 IST

बुलढाण्याला जमतेय मग कोल्हापूरला का नाही?

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे गेले महिनाभर नोव्हेंबर, डिसेंबर २०२४चे इंधन आणि भाजीपाल्याचे सुमारे दीड कोटी रुपये पडून आहेत. जर येत्या चार दिवसांत हे पैसे मिळाले नाहीत तर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला इशारा शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील यांनी दिला आहे. पाटील म्हणाले, गेल्या वर्षीची इंधन भाजीपाला बिले अजून मिळालेली नाहीत. अजून सह्या व्हायच्या आहेत, असे शिक्षण विभागातून सांगण्यात येते. पन्हाळा तालुक्याचे २५ टक्के ऑक्टोबर अखेरची रक्कमपण जमा झालेली नाही. डिसेंबर २०२४ पर्यंतची अंड्यांची बिलेही अद्याप सर्व शाळांना मिळालेली नाहीत. सर्व शाळांना दिलेली नाही. चंदगड तालुक्याची २०१७-१८च्या बिलांबाबत पुणे शिक्षण संचालकस्तरावरील पत्र आले होते. चंदगडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या कामाची पूर्तता केली आहे. परंति जिल्हा परिषदस्तरावर हे काम प्रलंबित आहे.गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत याबाबत बैठक झाली आहे. स्पष्टपणे यावेळी चर्चा झालेली असताना अजूनही ही बिले कोणामुळे थांबली आहेत, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे. कोणाच्या टेबलवर यासंदर्भातील फाईल किती दिवस थांबली, याची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. महिनाभर बिलाची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा न करण्यात कोणाची नेमकी काय अडचण आहे, असाही प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.बुलढाण्याला जमतेय मग कोल्हापूरला का नाही?जानेवारीची बिले सोमवारी राज्य पातळीवरून जिल्हा परिषदेच्या पातळीवर जमा झाली आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेने मंगळवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी ही बिले शाळांच्या खात्यावर जमा केली आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेला जे जमते ते कोल्हापूर जिल्हा परिषदेला का जमत नाही, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदSchoolशाळाfundsनिधी