कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:42 IST2021-08-07T17:39:56+5:302021-08-07T17:42:06+5:30
प्रेमभंग झाल्यामळे कल्याणमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
प्रेमभंग झाल्यामळे कल्याणमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरूणाच्या प्रेयसीने मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने आत्महत्या केली. आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितले आहे.याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
अंकुश नामदेव पवार ( 27).असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावात कुटूंबातसह राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने मृत अंकुश हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कल्याण येथे आला. कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून नोकरी करत होता. यादरम्यान एका घटस्फोटीत तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अंकुशला या तरूणीशी लग्न करायचे असल्याने तो पगाराचे पैसे तिच्याकडे जमा करत होता. मात्र तरुणी हे पैसे स्वतःच्या मौजमजेसाठी वापरत होती. ही बाब अंकुशला समजल्यावर त्यांच्यात खटके उडू लागले. यावेळी तू मर जा , मला तुझी गरज नाही असे सांगीतले. प्रेयसीच्या या बोलण्याने अंकुश व्यथित झाला होता. गुरुवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास प्रेमात धोका मिळाल्याचे सांगत अंकुशने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली.