अनैतिक संबंधांच्या वादातून डोंबिवलीत पत्नीला जाळून मारले; जखमी पतीवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 07:41 IST2022-10-03T07:40:32+5:302022-10-03T07:41:23+5:30

‘आम्हाला लवकरात लवकर येथून घेऊन चला नाहीतर पप्पा आम्हाला जीवे मारतील,’ असे प्रीतीसह तिच्या दोन्ही मुलींनी सांगितले होते.

wife burnt to death in dombivli over dispute of immoral relationship a case has been filed against the injured husband | अनैतिक संबंधांच्या वादातून डोंबिवलीत पत्नीला जाळून मारले; जखमी पतीवर गुन्हा दाखल 

अनैतिक संबंधांच्या वादातून डोंबिवलीत पत्नीला जाळून मारले; जखमी पतीवर गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : अनैतिक संबंधाच्या वादातून पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पूर्वेतील भोपर परिसरात शनिवारी घडली. या घटनेत महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला असून, दोघा मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. यात पतीही जखमी झाला आहे.

अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे महिलेच्या भावाचे म्हणणे असून, त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २००७ मध्ये पेण येथे राहणाऱ्या प्रीतीने (३५) प्रसाद पाटील (४०) याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना समीरा (१४) आणि समीक्षा (११) या मुली आहेत. परंतु, मुली झाल्याच्या कारणावरून प्रसाद हा प्रीतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. त्यानंतर,१० वर्षांपासून प्रीती आणि प्रसाद हे कुटुंबीयांसोबत भोपर येथील मूळ गावी राहण्यास आले. तेथे प्रसादचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने तो चार-चार दिवस घराबाहेर राहू लागला. प्रीतीने प्रसादला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. 

२०१५ मध्ये प्रीती आणि त्यांच्या मुलींना जीवे मारण्याचा प्रयत्न प्रसादने केला होता. याप्रकरणी प्रीतीने मानपाडा पोलिसात तक्रार दिली होती. या गुन्ह्यात प्रसादला अटक झाली होती. त्यानंतर, ते पुन्हा एकत्र राहत होते. 

घटनेला कलाटणी

शनिवारी पहाटे भोपर गावात एका घराला आग लागून त्यात एका महिलेसह दोन मुली आणि एक पुरुष होरपळल्याची घटना घडली होती. मात्र, अनैतिक संबंधातूनच पतीनेच पत्नीसह दोन मुलींना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. पप्पा आम्हाला मारतील प्रीतीच्या माहेरचे जेव्हा तिच्या घरी प्रसादशी चर्चा करण्यासाठी गेले होते त्यावेळी, ‘आम्हाला लवकरात लवकर येथून घेऊन चला नाहीतर पप्पा आम्हाला जीवे मारतील,’ असे प्रीतीसह तिच्या दोन्ही मुलींनी सांगितले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: wife burnt to death in dombivli over dispute of immoral relationship a case has been filed against the injured husband