Video: शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय मुलीवर १०-१५ भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सुरक्षारक्षकामुळे टळला अनर्थ, डोंबिवलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:25 IST2026-02-09T10:12:20+5:302026-02-09T10:25:06+5:30
शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

Video: शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय मुलीवर १०-१५ भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सुरक्षारक्षकामुळे टळला अनर्थ, डोंबिवलीतील घटना
डोंबिवली: शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सुदैवाने, सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखल्यामुळे या मुलीचा जीव थोडक्यात वाचला आहे.
राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...
नेमकी घटना काय?
सोमवारी सकाळी ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती सोसायटीच्या परिसरातून जात असताना, तिथे आधीच कळपाने बसलेल्या १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर मागून हल्ला केला. कुत्रे अंगावर धावून आल्याने ती प्रचंड घाबरली आणि बचावासाठी पळू लागली. यामुळे कुत्रे अधिक आक्रमक झाले आणि तिच्या मागे धावू लागले.
सुरक्षारक्षक ठरला 'देवदूत'
कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मुलगी जोराने किंचाळू लागली. तिचा आवाज ऐकताच परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने तातडीने त्या दिशेने धाव घेतली. त्याने लाठीच्या सहाय्याने कुत्र्यांना हुसकावून लावले, यामुळे कुत्र्यांनी मुलीची पाठ सोडली. या घटनेत मुलगी सुदैवाने गंभीर जखमी झाली नसली, तरी ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
पलावा सारख्या उच्चभ्रू वस्तीत भटक्या कुत्र्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आणि स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सुरू आहे.
डोंबिवली: शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. pic.twitter.com/76wrFb0KRj
— Lokmat (@lokmat) February 9, 2026