गोळीबार प्रकरण विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी
By सदानंद नाईक | Updated: February 8, 2024 20:00 IST2024-02-08T20:00:21+5:302024-02-08T20:00:50+5:30
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली

गोळीबार प्रकरण विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणातील चौथा आरोपी विकी गणोत्रा याला उल्हासनगर न्यायालयाने १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. विकी याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नाशिक येथून अटक केली होती.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. नाशिक येथून अटक केलेल्या विकी गणोत्रा याला गुरवारी दुपारी उल्हासनगर न्यायलयासमोर उभे केले असता, १२ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली. गणोत्रा यालाही कळवा पोलीस ठाण्यात ठेवले असून यातील फरार आरोपी आमदार पुत्र वैभव गायकवाड व नागेश बेडेकर यांचा पोलीस शोध घेण्यात येत आहे. आमदार गणपत गायकवाड व एका केंद्रीय मंत्र्याच्या जवळ असलेला विकी गणोत्रा हा त्यांच्या व्यवसायात भागीदार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले जाते.