केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अपघात पाहून ताफा थांबविला, अपघातातील जखमी चालकाला नेले रुग्णालयात
By अनिकेत घमंडी | Updated: October 3, 2022 16:57 IST2022-10-03T16:56:29+5:302022-10-03T16:57:14+5:30
Kapil Patil : मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रस्त्यात अपघात झाल्यानंतर, तत्काळ ताफा थांबवून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील बापसईजवळ अपघात झाला होता.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अपघात पाहून ताफा थांबविला, अपघातातील जखमी चालकाला नेले रुग्णालयात
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रस्त्यात अपघात झाल्यानंतर, तत्काळ ताफा थांबवून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील बापसईजवळ अपघात झाला होता.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा ताफा बापसईजवळ पोचल्यानंतर, एका टेम्पोला अपघात झाल्याचे दिसले. त्यावेळी कपिल पाटील यांनी तत्काळ आपली गाडी थांबवून जखमींना मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात टेम्पोचालक सोमनाथ गवाळे जखमी झाले होते. त्यांना लगेच गाडीत बसवून गोवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात सोमनाथ गवाळे यांना हलविण्यात आले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी डॉक्टरांना दूरध्वनी करून आवश्यक उपचार करण्याची सूचना केली.