उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण

By सदानंद नाईक | Updated: July 11, 2023 17:53 IST2023-07-11T17:52:29+5:302023-07-11T17:53:37+5:30

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या २२ शाळा असून त्यामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत.

Ulhasnagar municipal school building work incomplete, MNS alleges, | उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण

उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण

सदानंद नाईक 
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील महापालिका शाळा क्रं-८, ११ व २९ च्या इमारतीचे बांधकाम मंजुरी आराखड्यानुसार नसतांना, ठेकेदाराकडून पूर्ण बिलाची मागणी होत आहे, असा आरोप मनसे विध्यार्थी सेनेने करून अश्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या २२ शाळा असून त्यामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र शाळा इमारती १९६० पूर्वीच्या असल्याने, त्या जीर्ण होऊन गळती लागली. दरम्यान त्यापैकी काही शाळा इमारती नव्याने बांधण्यात आल्या आहेत. कॅम्प नं-३ येथील शाळा क्रं-८, ११ व २९ शाळा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली. मंजूर शाळा आराखड्यानुसार शाळा प्रांगणातील काम अर्धवट असतानाही, ठेकेदाराने लेखाविभागाकडे चेक टाकल्याची माहिती मनसे विध्यार्थी सेनेच्या वैभव कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी महापालिकेला पत्र देऊन शाळेचे काम पूर्ण झाल्यावर चेक देण्याची मागणी केली. 

महापालिका शाळा क्रं- ८, ११ व २९ पुर्न:बांधणी काम सन-२०१७ साली देण्यात येऊन कामाचा कालावधी अठरा महिन्याचा होता. शाळा इमारतीचे काम पूर्ण होऊन, इमारती मध्ये शाळा सुरू झाली आहे. मात्र मंजूर आराखड्यानुसार शाळा आवारात गार्डन, मेन गेट, शौचालय इत्यादी जवळ - जवळ १५ ते २० लाखांची Lलकामे बाकी आहेत. असी माहिती वैभव कुलकर्णी यांनी उघड केली. जोपर्यंत अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होत नाही. तोपर्यंत ठेकेदाराने बिले अदा करूनये अशी मागणी आयुक्ताकडे केली.

Web Title: Ulhasnagar municipal school building work incomplete, MNS alleges,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.