कल्याणमध्ये उद्धव ठाकरे समर्थकावर हल्ला; शिंदे गटावर आरोप, प्रकरण पोलीस ठाण्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 17:54 IST2022-07-20T17:52:46+5:302022-07-20T17:54:04+5:30
Kalyan : कल्याणचे शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे समर्थकावर हल्ला; शिंदे गटावर आरोप, प्रकरण पोलीस ठाण्यात!
- मयुरी चव्हाण
कल्याण : राज्यात गेल्या काही दिवासांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये वाद होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याणमधील राजकीय वातावरण तापले आहे. कल्याणचे शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण पूर्वेतील संतोषी माता रस्त्याने गाडीतून जात असताना हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. तलवार व लोखंडी रॉडने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पालांडे यांच्यावरील हल्ला एकनाथ शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र महेश गायकवाड यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ही घटना दुर्देवी असून या घटनेशी माझा काही संबंध नाही, असे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.