शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा कार्यकर्ता असेल तर निबंध लिहून सोडणार का? बदलापूर प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 14:01 IST

बदलापुरातील आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Badlapur School Case : बदलापूरच्या आदर्श विद्यालयात एका चार वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण बदलापूरात उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोट करण्यात आलीय. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर जमावाने कारवाईची मागणी करत पोलिसांवर दगडफेक केली आहे. या प्रकरणी आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत कोणतेही राजकारण न करता आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी करत रेलरोको करण्यात आला आहे. दुसरीकडे, ज्या शाळेत ही घटना घडली तिथे तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी  या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी असे म्हटलं आहे.

"अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. आपल्याकडे अशी पद्धत सुरु झालीय की अशा घटनांचे राजकारण केलं जात आहे. लाडकी बहीण योजना आणत असताना लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. एखाद्या राज्यात काय देशात कुठेही अशाप्रकारची घटना होता कामा नये. या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला वेळ लागला. एखाद्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या घटनेसाठी ते गुन्हेगार जबाबदार असतात तसेच त्यावर न्यायनिवाडा करुन शिक्षा देण्यात दिरंगाई करणारे देखील जबाबदार धरले पाहिजेत. हे झालं तर अशा गोष्टींना आळा बसेल. कुठेही काही घडलं तरी कोणीही सुटता कामा नये. सगळेजण पक्ष जात पात विसरून एकत्र झाले तरच आपल्या राज्यातील महिला सुरक्षित राहतील. तरच आपण माझ्या राज्यातील महिला ही लाडकी बहीण आहे असं म्हणू शकतो," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

"शक्ती विधेयक कायदा आम्ही आणू शकलो नाही कारण गद्दारी करुन आमचं सरकार पाडलं गेलं. ज्यांनी गद्दारी केली त्यांची जबाबदारी आहे या शक्ती कायद्याची शक्ती गुन्हेगारांना दाखवून देण्याची. मला असं कळलं आहे की ती शाळा भाजपच्या लोकांशी संबधित होती. याच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. जर का हा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून सोडून देणार आहात का? कुठेही राजकारण न करता कारवाई झाली पाहिजे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरे